शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

रेल्वे स्टेशनवर कोरोना चाचणी केंद्र झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 1:04 AM

नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम

नवी मुंबई : बेलापूर, नेरूळ व वाशी रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेने कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत. पहिल्या दिवशी ४०० पेक्षा जास्त प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. 

 कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जलद रुग्ण शोधण्यावर लक्ष केंद्रित केले असून लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तत्काळ तपासणी करावी. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचीही चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. शहरात सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. एपीएमसी व एमआयडीसीमध्ये विशेष केंद्रे सुरू केली आहेत. याव्यतिरिक्त आता रेल्वे स्टेशनमध्ये कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बेलापूर, नेरूळ व वाशी स्टेशनवर ही सुविधा सुरू केली आहे. इतर रेल्वे स्टेशनवरही टप्प्याप्प्याने ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ६ जणांचे पथक तैनात केले आहे. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या दिवशीच ४०० पेक्षा जास्त प्रवाशांच्या चाचण्या केल्या.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्न-धान्य खरेदीसाठी मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहक व किरकोळ विक्रेते जात असतात. माथाडी कामगार, व्यापारी, गाळ्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, एपीएमसीचे कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. यामुळे बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तेथील चाचणी केंद्रे अधिक गतिमान केली आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या