नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत तब्बल दीड लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तब्बल २८ टक्के नागरिकांचे क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सद्यस्थितीमध्ये २,२६६ आॅक्सिजन बेड उपलब्ध आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्युदर ३.५४ वरून २.१९ वर आला आहे. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्यात येत आहेत. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेने खासगी व मनपा रुग्णालयांमध्ये १३१ व्हेंटिलेटर्स, ३३५ आयसीयू, २,२६६ आॅक्सिजन बेड व ३,३०८ सर्वसाधारण बेड उपलब्ध केले आहेत, याशिवाय कोविड केअर सेंटरमध्ये २,८५६ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली, तरी बेडची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरसह मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील निर्यात भवन, तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग भवन, सानपाडामधील एमजीएम रुग्णालय येथेही नवीन सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
कोरोना रुग्ण वेळेत निदर्शनास यावे, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. महानगरपालिकेने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल सव्वाचार लाख नागरिकांचे क्वारंटाइन पूर्ण केले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे प्रमाण २८ टक्के आहे. अँटिजेन व स्वत:च्या लॅबमुळे चाचणीसाठीचा विलंब थांबला आहे. नागरिकांना शहरातील उपलब्ध रुग्ण खाटांची माहिती मिळावी, यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. मनपाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स व आयसीयू कोणत्या रुग्णालयात उपलब्ध आहेत, याचीही माहिती दिली आहे. खासगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आली आहे.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील सुविधा
च्शहरात ३३५ आयसीयू बेड्स,१३१ व्हेंटिलेटर्स, २२६६ आॅक्सिजन व ३,३०८ सर्वसाधारण बेडची सुविधा.च् नागरिकांना बेड्सची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी संकेतस्थळावर डॅशबोर्डची सुविधाच् आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता दूर करण्यासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयासोबत २०० आयसीयू व ८० व्हेंटिलेटर्ससाठी करार.च् क्रोनिक किडनी डिसीज असणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तींकरिता डायलिसिसची सुविधानवीन कोविड हेल्थ सेंटरमधील सुविधाच् राधास्वामी सत्संग भवनमध्ये ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर ४११ आॅक्सिजन बेडची सुविधाच् एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ३ मजली इमारतीमध्ये ५१७ आॅक्सिजन बेडची सुविधाच् सानपाडा एमजीएम रुग्णालयात ७५ आॅक्सिजन बेडची उपलब्धताच् तीनही नवीन केंद्रांमध्ये एक्स-रे व रक्त तपासणीसह पॅथॉलॉजिकल सुविधाच् महिलांसाठी नवीन केंद्रामध्ये स्वतंत्र कक्ष व सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्थाच् मेंटली चॅलेंज व स्पेशल नीड रुग्णांसाठी विशेष कक्ष कार्यान्वितच् रुग्णांच्या करमणुकीसाठी एलईडी टीव्ही व वाय-फाय सुविधाच् रुग्णांना नातेवाइकांशी संवाद साधता यावा, यासाठी व्हिडीओ कॉलची सुविधामनपाच्या वतीने करण्यात आलेली कार्यवाहीच् कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी मिशन ब्रेक द चेन अभियान सुरूच् जलद रुग्ण शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविलीच् २२ तपासणी केंद्र व सोसायटीत जाऊन ३४ मोबाइल व्हॅनद्वारे अँटिजेन तपासणीच् शहराच्या १५ लाख लोकसंख्येमधून दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी पूर्णच् शहरातील एकूण लोकसंख्येपैकी २८ टक्के नागरिकांचे क्वारंटाइनच् मृत्युदर ३.५४ वरून २.१९ वर आणण्यात यश