Corona Vaccination:नवी मुंबई महापालिकेचे दररोज दहा हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:59 AM2021-04-04T00:59:41+5:302021-04-04T01:00:09+5:30
शहरात ४२ लसीकरण केंद्रे कार्यरत : नवीन केंद्रेही वाढविण्यात येणार : रविवारीही लसीकरण सुरू राहणार
नवी मुंबई : महानगरपालिका कोरोना लसीकरणाचा वेग वाढवून दररोज सरासरी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. टप्प्याटप्प्याने त्यासाठीची केंद्र व इतर साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीमध्ये ४२ केंद्र कार्यरत असून, रविवारीही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात गृहनिर्माण सोसायट्यांसाठी एकत्रितपणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत एक लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. यासाठी पुढील काही काळात प्रतिदिन दहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशापद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी केंद्र व मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीमध्ये पालिकेची २४ व १८ खासगी केंद्र शहरात सुरू आहेत. मनपाच्या नेरूळमधील मॉसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, ऐरोलीमधील राजमाता जिजाऊ रुग्णालय व वाशीतील सार्वजनिक रुग्णालय येथे २४ तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयएस रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. हे केंद्र सकाळी ८ ते सायंकाळी ८पर्यंत सुरू राहणार आहे. उर्वरित महानरपालिकेची व खासगी केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहेत. नवी मुंबईमध्ये लसीकरणाला गती देण्यासाठी भविष्यात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांची एकत्रित नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी एकत्रितपणे लसीकरणासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जात आहे. प्रत्येक विभागनिहाय लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे. ज्या परिसरात लसीकरण कमी आहे. तेथे विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की लसीकरणाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा
चिंचपाडा
वाशी गाव सेक्टर २
करावे
शिरवणे गाव
जुहूगाव
राबाडागाव
ऐरोली सेक्टर २
इंदिरानगर
तुर्भे स्टोअर
सानपाडा
खैरणे
सीबीडी बेलापूर
कुकशेत सेक्टर १६
पावणेगाव
घणसोली सेक्टर ६
कातकरीपाडा
दिघागाव, इलठणपाडा, सीवूड सेक्टर ४८
महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे
सार्वजनिक रुग्णालय वाशी
राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली
मॉसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ
जम्बो कोविड सेंटर ईएसआयसी रुग्णालय सेक्टर ५ वाशी
रामतनू माता बाल रुग्णालय तुर्भे
शहरातील लसीकरणाचा तपशील
आरोग्य कर्मचारी - २४८२२
पहिल्या फळीतील
कर्मचारी - १८५५९
ज्येष्ठ नागरीक - ४३३९२
सहव्याधी - १०२७७
४५ वर्षावरील नागरिक - ८८४७
एकूण - १०५८९७
खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रे
सुयश हॉस्पिटल, नेरूळ
सुश्रुषा रुग्णालय, नेरूळ
हिरानंदानी रुग्णालय, वाशी
एमजीएम रुग्णालय, वाशी
डिव्हाइन हॉस्पिटल, घणसोली
रिलायनस हॉस्पिटल, खैरणे
आर. एन. पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा
आचार्य श्री नानेश हॉस्पिटल
सीबीडी, बेलापूर
महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, सानपाडा
न्यूरोजन हॉस्पिटल सीवूड, नेरूळ
साई स्नेहदीप हॉस्पिटल, खैरणे
माथाडी हॉस्पिटल, कोपरखैरणे
तेरणा हॉस्पिटल, नेरूळ
अपोलो हॉस्पिटल, बेलापूर
सनशाईन हॉस्पिटील, नेरूळ
मंगलप्रभू हॉस्पिटल, जुईनगर
डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरूळ
इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली सेक्टर-३