नवी मुंबई : महानगरपालिका कोरोना लसीकरणाचा वेग वाढवून दररोज सरासरी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. टप्प्याटप्प्याने त्यासाठीची केंद्र व इतर साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीमध्ये ४२ केंद्र कार्यरत असून, रविवारीही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात गृहनिर्माण सोसायट्यांसाठी एकत्रितपणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवी मुंबईमध्ये आतापर्यंत एक लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. यासाठी पुढील काही काळात प्रतिदिन दहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशापद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी केंद्र व मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीमध्ये पालिकेची २४ व १८ खासगी केंद्र शहरात सुरू आहेत. मनपाच्या नेरूळमधील मॉसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, ऐरोलीमधील राजमाता जिजाऊ रुग्णालय व वाशीतील सार्वजनिक रुग्णालय येथे २४ तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयएस रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. हे केंद्र सकाळी ८ ते सायंकाळी ८पर्यंत सुरू राहणार आहे. उर्वरित महानरपालिकेची व खासगी केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहेत. नवी मुंबईमध्ये लसीकरणाला गती देण्यासाठी भविष्यात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांची एकत्रित नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी एकत्रितपणे लसीकरणासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जात आहे. प्रत्येक विभागनिहाय लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे. ज्या परिसरात लसीकरण कमी आहे. तेथे विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की लसीकरणाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा चिंचपाडावाशी गाव सेक्टर २करावेशिरवणे गावजुहूगावराबाडागावऐरोली सेक्टर २इंदिरानगरतुर्भे स्टोअरसानपाडाखैरणे सीबीडी बेलापूर कुकशेत सेक्टर १६पावणेगावघणसोली सेक्टर ६कातकरीपाडादिघागाव, इलठणपाडा, सीवूड सेक्टर ४८महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे सार्वजनिक रुग्णालय वाशीराजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीमॉसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ जम्बो कोविड सेंटर ईएसआयसी रुग्णालय सेक्टर ५ वाशी रामतनू माता बाल रुग्णालय तुर्भे शहरातील लसीकरणाचा तपशील आरोग्य कर्मचारी - २४८२२पहिल्या फळीतील कर्मचारी - १८५५९ज्येष्ठ नागरीक - ४३३९२सहव्याधी - १०२७७४५ वर्षावरील नागरिक - ८८४७एकूण - १०५८९७खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रे सुयश हॉस्पिटल, नेरूळ सुश्रुषा रुग्णालय, नेरूळ हिरानंदानी रुग्णालय, वाशीएमजीएम रुग्णालय, वाशीडिव्हाइन हॉस्पिटल, घणसोलीरिलायनस हॉस्पिटल, खैरणेआर. एन. पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडाआचार्य श्री नानेश हॉस्पिटल सीबीडी, बेलापूरमहात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, सानपाडान्यूरोजन हॉस्पिटल सीवूड, नेरूळ साई स्नेहदीप हॉस्पिटल, खैरणे माथाडी हॉस्पिटल, कोपरखैरणे तेरणा हॉस्पिटल, नेरूळ अपोलो हॉस्पिटल, बेलापूर सनशाईन हॉस्पिटील, नेरूळ मंगलप्रभू हॉस्पिटल, जुईनगरडी. वाय. पाटील हॉस्पिटल, नेरूळ इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली सेक्टर-३