कोरोना काळात सलग १०० दिवस धावण्याचा संकल्प पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:29 PM2020-10-04T23:29:42+5:302020-10-04T23:29:46+5:30

बाळासाहेब झंजे यांचा विक्रम; २७ जून ते ४ ऑक्टोबरदरम्यान दररोज १० किमी अंतर केले पार

Corona's resolve to run for 100 days in a row is fulfilled | कोरोना काळात सलग १०० दिवस धावण्याचा संकल्प पूर्ण

कोरोना काळात सलग १०० दिवस धावण्याचा संकल्प पूर्ण

googlenewsNext

पनवेल : कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती सलग १०० दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज ७ ते १० किमीचे अंतर गाठत असत. दि.२७ जून ते ४ आॅक्टोबरदरम्यान झंजे यांनी आपला १०० दिवस धावण्याचा विक्रम पूर्ण केला.

नवीन पनवेलमधील गुड मॉर्निंग रनर ग्रुपचे सदस्य आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी दररोज व्यायाम, योगा करत असतात. त्यातूनच झंजे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सलग १०० दिवस सलग धावण्याचा संकल्प केला. या संकल्पात ग्रुपचे सदस्य व पोलीस दलातील सेवेत असलेले चांगदेव भोसले, रवी कुमार, जयेश टेंबे, माधव भाहेकर हेही सहभागी झाले. या संकल्पादरम्यान सर्वांनी आपले ध्येय साध्य करत असताना, विविध पर्यटन ठिकाणे, गड-किल्ले आदींना भेट दिली. यामध्ये आंबेनळी घाट, मोरबे धरण, प्रतापगड, रायगड आदींसह रायगड-पनवेल परिसरातील पर्यटन ठिकाणांचा समावेश आहे. रविवारी पनवेलमधील पुष्पकनगर या ठिकाणी सुमारे २१ किमीचे अंतर गाठत आपला १०० दिवसांचा संकल्प पूर्ण केला. या काळात सुमारे ७५० किमीपेक्षा जास्त अंतर सर्वांनी गाठले. मागील वर्षी अशाच प्रकारचा संकल्प गुड मॉर्निंग रनर ग्रुपच्या या सदस्यांनी पूर्ण केला.

शासकीय कामात कोणताही व्यत्यय न आणता, मी व माझ्या साथीदारांनी आम्ही स्वत: ठरविलेला संकल्प पूर्ण केला. चांगले आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येकाने अशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास, प्रत्येक जण सुदृढ बनेल. कोरोनासारख्या संकटात आपल्याला आपले स्वास्थ्य निरोगी राखता येईल. याकरिता प्रत्येकाने अशा प्रकारे संकल्प स्वीकारणे गरजेचे आहे
- बाळासाहेब झंजे

Web Title: Corona's resolve to run for 100 days in a row is fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.