coronavirus: पाच दिवसांमध्ये १५७५ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:36 PM2020-07-08T23:36:35+5:302020-07-08T23:36:48+5:30
पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे गांभीर्य नागरिकांकडून घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन लावलेला असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार बुधवारी ३ हजार ९०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पाच दिवसांत तब्बल १५७५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे गांभीर्य नागरिकांकडून घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनदरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात (परिमंडळ १) २२ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्या ठिकाणी बुधवारी ३ हजार ९०० कारवाया करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कारवाईचा धडाका सुरू असतानाही नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी १,५५४ जणांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तर ३९९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शिवाय मास्कचा वापर न करणाºया ४६ जणांवर, सामाजिक अंतर न राखणाºया ८६ जणांवर तर महामारी कायद्यांतर्गत २०९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिमंडळ १चे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सलग पाचव्या दिवशीही कारवाया सुरू आहेत. या पाच दिवसांत पोलिसांनी तब्बल १ हजार ५७५ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने विनाकारण एका विभागातून दुस-या विभागात फिरताना आढळल्या व्यक्तींची आहेत. तर पालिकेने दिलेल्या वेळेत व्यवसाय बंद न करणाºया सात जणांवर गुन्हे दाखल केले
आहेत.