coronavirus: नवी मुंबईत कोरोनाचे २३९ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:31 AM2020-07-10T00:31:23+5:302020-07-10T00:31:27+5:30

गुरुवारी बेलापूरमध्ये २४, नेरूळमध्ये ५९, वाशीमध्ये २४, तुर्भेमध्ये ११, कोपरखैरणेत ४८, घणसोलीत ३९, ऐरोलीत २९ व दिघामध्ये ५ जण आढळून आले आहेत.

coronavirus: 239 new corona posiive patients in Navi Mumbai | coronavirus: नवी मुंबईत कोरोनाचे २३९ नवीन रुग्ण

coronavirus: नवी मुंबईत कोरोनाचे २३९ नवीन रुग्ण

Next

नवी मुंबई : लॉकडाऊन सुरू असतानाही शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारी २३९ नवीन रुग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या ८,५१८ झाली आहे.
गुरुवारी बेलापूरमध्ये २४, नेरूळमध्ये ५९, वाशीमध्ये २४, तुर्भेमध्ये ११, कोपरखैरणेत ४८, घणसोलीत ३९, ऐरोलीत २९ व दिघामध्ये ५ जण आढळून आले आहेत. प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या २८७ झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिवसभरात १७० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ५,०८३ रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. सद्य:स्थितीमध्ये ३,१५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अद्याप ३१६ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ५५,८५८ जणांचे क्वारंटाइन पूर्ण झाले असून, सद्य:स्थितीमध्ये ३४,१३६ जणांचे क्वारंटाइन सुरू आहे.

Web Title: coronavirus: 239 new corona posiive patients in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.