coronavirus: अग्निशमन कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत, एकास लागण झाल्याने २४ जण क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:08 AM2020-05-13T00:08:30+5:302020-05-13T00:09:06+5:30
शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
नवी मुंबई : वाशीतील अग्निशमन केंद्रात काम करणारा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांवर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, त्या पॉझिटिव्ह कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यादरम्यान त्यांच्याही आरोग्याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी वाशी अग्निशमन दलात काम करणाºया एका कर्मचाºयाला कोरोना झाल्याचे समोर आले. हा कर्मचारी डोंबिवली परिसरात राहणारा असून तिकडेच त्याने चाचणी केली होती. त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच प्रशासने त्याच्या ड्युटीमध्ये काम करणाºया २४ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तर शहराबाहेरच्या भागातून येणाºया कर्मचाºयांना तूर्तास रजा देण्यात आली असल्याचेही समजते. तर प्रत्येक अग्निशमन केंद्रातील किमान चार ते पाच कर्मचारी शहराबाहेरील असल्याने त्यांच्या संपर्कात येणारे कर्मचारीही चिंता व्यक्त करत आहेत.
नवी मुंबईत कोरोना पसरण्यास शहराबाहेर होणारा प्रवास व एपीएमसीमधील गर्दी कारणीभूत ठरत असल्याचे आजवर दिसून आले आहे.
कर्मचाºयांमध्ये भीती
च्अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी शहराबाहेरून येणाºया कर्मचाºयांना सुट्टी दिल्याचे समजते. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाºयालाच कोरोना झाल्याने इतरही कर्मचाºयांमध्ये भीती पसरली आहे.