coronavirus: नवी मुंबईमध्ये ३६१ कारवाया, विनाकारण घराबाहेर निघणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 01:35 AM2020-07-06T01:35:16+5:302020-07-06T01:35:36+5:30
कोरोनाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांकडून आवश्यक ठिकाणी नाकाबंदी असून परिमंडळ एकमध्ये २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईत पोलिसांनी ३६१ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये ९२ वाहनांचा समावेश असून, ती जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊन असतानाही विनाकारण घराबाहेर निघाल्याप्रकरणी या कारवाया करण्यात आल्या आहेत.
कोरोनाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांकडून आवश्यक ठिकाणी नाकाबंदी असून परिमंडळ एकमध्ये २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणावरून एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यानुसार, नाकाबंदीच्या ठिकाणी २११ कारवाया करण्यात आल्या आहेत. महामारी रोग अधिनियमांतर्गत १८ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेक ठिकाणी नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत. अशा ठिकाणी गस्त घालून ४० जणांवर कारवाई केल्याचे परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
लॉकडाऊनदरम्यान मद्यविक्री केंद्रांना आॅनलाइन घरपोच सुविधा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी मद्यविक्री केंद्राबाहेरच गर्दी जमवून मद्यविक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता कामगार नेमण्यात आले असून, ते मद्यविक्री केंद्राच्या बाजूलाच मद्यसाठा घेऊन उभे असतात. एखादा ग्राहक आल्यास त्याच ठिकाणी रोखीने व्यवहार करत मद्यविक्री केली जात आहे.
पनवेलमध्ये ४८४ जणांवर कारवाई
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ३ ते १४ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, पण लॉकडाऊनचे उल्लंघन करणाºया ४८४ जणांवर पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली आहे.
पालिका आयुक्त परिमंडळ २च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सुमारे ३०१ केसेस दाखल झाल्या आहेत. भादंवी कलम १८८ अन्वये १०१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा २१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाºया १८ नागरिकांवर
कारवाई केली आहे. एका दुकानदारावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाहने केली जप्त
प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केलेल्या
५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अनावश्यक फिरणाºया ३६ जणांवर कारवाई करून त्यांची
वाहने जप्त क रण्यात आली आहेत.