नवी मुंबई : नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दहा दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. मंगळवारी पाच नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ७४ झाली .दिवागाव ऐरोली येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिघांना बाधा झाली होती. त्यामधील एकाच्या पत्नी व मुलालाही कोरोना झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. करावेमधील वार्डबॉयच्या संपर्कात आलेल्या एक व्यक्तीला व घणसोली नोसील नाका येथील तरुणालाही कोरोना झाला आहे. या पाचही रुग्णांना मनपाच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांचा संपर्क आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे.नवी मुंबई हद्दीत ११ मार्चला ३५ रूग्ण होते. दहा दिवसामध्ये दुप्पट वाढ होवून रुग्णांचा आकडा ७४ झाला आहे. आतापर्यंत २३ रूग्ण बरे झाले आहेत. तब्बल २१४४ जणांना कॉरंटाईन करण्यात आले असून १८४० जणांचे कॉरंटाईन पूर्ण झाले आहे. मनपा क्षेत्रातील २२९ जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत.
CoronaVirus: नवी मुंबईत आढळले ७४ रुग्ण; मंगळवारी पाच नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:50 AM