coronavirus: लॉकडाऊनला न जुमानणाऱ्या २४८ जणांवर कारवाई , ४२९ वाहने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:53 AM2020-07-08T00:53:07+5:302020-07-08T00:53:20+5:30
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी एकूण २ हजार ४७६ कारवाया केल्या आहेत.
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहरात लावलेल्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी मंगळवारी एकूण २ हजार ४७६ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनच्या आदेशाला न जुमानणाºया २४८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर विनाकारण फिरणाऱ्यांची ४२९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी एकूण २ हजार ४७६ कारवाया केल्या आहेत. २२ ठिकाणी असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची चौकशी करून, या कारवाया केल्या जात आहेत. यावेळी विनाकारण फिरताना आढळणाºयांवर गुन्हे दाखल कारण्यासाठी त्यांच्या वाहनांच्या जप्तीची कारवाई होत आहे. त्यानुसार, लॉकडाऊन असतानाही आदेश डावलून विनाकारण घराबाहेर फिरणाºया २४८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मोटर वाहन कायद्यांतर्गत विविध हेडखाली १,८०७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ४२९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
त्याशिवाय मास्क न वापरणाºया ५१ जणांवर, मॉर्निंग वॉक करणाºया ११ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाºया ८१ जणांवर कारवाई झाली आहे. शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी हा लॉकडाऊन होत असतानाही अनेक जण त्याचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने पोलिसांकडून या कारवाई केल्या जात आहेत.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, दुकानदारांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर महानगरपालिकेने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. वाशी, कोपरखैरणेसह इतर ठिकाणी ही कारवाई केली असून, मास्क न वापरणाºयांकडून तीन दिवसांत २ लाख २२ हजार रुपए दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने ४ जुलै ते १३ जुलैदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यावर नाहक ताण येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसळ विभागनिहाय नियुक्त केलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकाºयांना संबंधित विभागातील पोलीस यंत्रणेसह लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दररोज नियमित विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून सर्व समन्वय अधिकाºयांनी आपापल्या विभागीय क्षेत्रात पोलीस अधिकाºयांसह प्रत्यक्ष फेरी मारून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
वाशी येथील सेंटरवन मॉलमधील वाशी सेंट्रल दुकानात अत्यावश्यक वस्तूंखेरीज छुप्या पद्धतीने इतर वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला.
या ठिकाणी अत्यावश्यक मालाखेरीज इतर मालाची विक्री झाल्याचे ४ जुलै रोजीचे देयक हाती लागल्याने या पुराव्याच्या आधारे ही कारवाई केली. कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात ४ दुकानदारांवर लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला.
तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातही दोन दुकानदारांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवल्याने गुन्हे नोंद करण्यात आला आहे. याशिवाय मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचे पालन न करणाºया नागरिक, दुकानदार यांच्याकडून ४ ते ६ जुलैदरम्यान २ लाख २२ हजार ८00 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.