Coronavirus : दुर्गसंवर्धनाच्या सर्व मोहिमाही केल्या रद्द, ‘दुर्गवीर’चा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:17 AM2020-03-18T02:17:29+5:302020-03-18T02:17:40+5:30
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील विविध किल्ल्यांवर संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यातील सर्व दुर्गसंवर्धन मोहिमा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील विविध किल्ल्यांवर संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यातील सर्व दुर्गसंवर्धन मोहिमा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील सुरगड, माणगड, मृगगड यासह राज्यातील रामगडसह जवळपास १२ पेक्षा जास्त किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने गड संवर्धनाचे काम सुरू आहे. येणाऱ्या रविवारी रामगडवर संवर्धन मोहीम आयोजित केली होती. याशिवाय २५ मार्चला रायगडमधील कावळ्याबावळ्या खिंडीत शौर्य दिनाचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्या दिवशी राज्यातील अनेक किल्ल्यांवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती दुर्गवीरचे संस्थापक संतोष हसुरकर यांनी दिली आहे.
गड-किल्ल्यांवर संवर्धनासाठी जाताना मुंबई व इतर ठिकाणावरून प्रवास करावा लागतो. गडावर जाण्याचा मार्ग तेथील गावांमधूनच जात असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जाहीर कार्यक्रम घेतले जाऊ नये. गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्तव्य म्हणून दुर्गवीरने मोहिमा बंद केल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसोबत घालवावा, असे आवाहनही संतोष हसूरकर यांनी केले आहे.
दुर्गवीरप्रमाणे इतरही शिवप्रेमी संघटनांनी दुर्गसंवर्धन व अभ्यास दौºयाच्या मोहिमा थांबविल्या आहेत. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य, कलावंतीण व प्रबळगडावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. नागरिकांनीही मिळालेल्या सुट्टीत अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.
कोरोनामुळे प्रवास केला रद्द
नवी मुंबईमधील शिवप्रेमी गणेश माने, प्रशांत पवार, विजय देशमुख यांनीही लोकमतशी बोलताना सांगितले की येणाºया रविवारी तुंग व तिकोना येथे भटकंती मोहीम आयोजित केली होती. परंतु शासनाने केलेल्या आवाहनानंतर ही मोहीम रद्द केली आहे. प्रवास करण्याचे टाळले असून कुटुंबीयांसोबतच वेळ घालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही साथ आटोक्यात येईपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.