शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Coronavirus : दुर्गसंवर्धनाच्या सर्व मोहिमाही केल्या रद्द, ‘दुर्गवीर’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:17 AM

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील विविध किल्ल्यांवर संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यातील सर्व दुर्गसंवर्धन मोहिमा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील विविध किल्ल्यांवर संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यातील सर्व दुर्गसंवर्धन मोहिमा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.रायगड जिल्ह्यातील सुरगड, माणगड, मृगगड यासह राज्यातील रामगडसह जवळपास १२ पेक्षा जास्त किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने गड संवर्धनाचे काम सुरू आहे. येणाऱ्या रविवारी रामगडवर संवर्धन मोहीम आयोजित केली होती. याशिवाय २५ मार्चला रायगडमधील कावळ्याबावळ्या खिंडीत शौर्य दिनाचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्या दिवशी राज्यातील अनेक किल्ल्यांवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती दुर्गवीरचे संस्थापक संतोष हसुरकर यांनी दिली आहे.गड-किल्ल्यांवर संवर्धनासाठी जाताना मुंबई व इतर ठिकाणावरून प्रवास करावा लागतो. गडावर जाण्याचा मार्ग तेथील गावांमधूनच जात असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जाहीर कार्यक्रम घेतले जाऊ नये. गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्तव्य म्हणून दुर्गवीरने मोहिमा बंद केल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसोबत घालवावा, असे आवाहनही संतोष हसूरकर यांनी केले आहे.दुर्गवीरप्रमाणे इतरही शिवप्रेमी संघटनांनी दुर्गसंवर्धन व अभ्यास दौºयाच्या मोहिमा थांबविल्या आहेत. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य, कलावंतीण व प्रबळगडावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. नागरिकांनीही मिळालेल्या सुट्टीत अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.कोरोनामुळे प्रवास केला रद्दनवी मुंबईमधील शिवप्रेमी गणेश माने, प्रशांत पवार, विजय देशमुख यांनीही लोकमतशी बोलताना सांगितले की येणाºया रविवारी तुंग व तिकोना येथे भटकंती मोहीम आयोजित केली होती. परंतु शासनाने केलेल्या आवाहनानंतर ही मोहीम रद्द केली आहे. प्रवास करण्याचे टाळले असून कुटुंबीयांसोबतच वेळ घालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही साथ आटोक्यात येईपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई