coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:40 AM2020-05-12T01:40:58+5:302020-05-12T01:41:45+5:30

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे.

coronavirus: All transactions in APMC closed, health check will be done from today | coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

coronavirus: एपीएमसीतील सर्व व्यवहार बंद, आजपासून आरोग्य तपासणी होणार  

Next

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रत्येक मार्केटमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती. एपीएमसी बंद करण्याची मागणी व्यापारी संघटना व नवी मुंबईमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन शासनाने ११ ते १७ मे दरम्यान पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका व एपीएमसीच्या पथकाने संपूर्ण मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा, गोदाम व इतर परिसर स्वच्छ केला जात आहे. मसाला मार्केटपासून स्वच्छतेला सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्वच्छ केल्या जाणार आहेत.

महापालिकेने एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगार व सर्व घटकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली आहेत. पथकांच्या माध्यमातून मंगळवारपासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सात दिवस कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोहीम अशी राबविणार

च्बाजार समितीमध्ये सात दिवस विशेष साफसफाई व औषध फवारणी केली जाणार आहे. सोमवारी मसाला मार्केटमधील रस्ते, गाळ्यांसमोरील मोकळी जागा व परिसराची साफसफाई करण्यात आली.
च्१३ मे रोजी धान्य मार्केट, १४ मे रोजी भाजी मार्केट, १६ मे रोजी फळमार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. महापालिका व बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.

बाजार समितीमधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्य तपासणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.
- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

वाहने मुंबईत थेट रवाना

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सात दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पुरेसे अन्नधान्य यापूर्वीच मुंबईत पाठविले आहे.

सोमवारी मार्केट बंद असल्यामुळे ४१४ वाहनांमधून कृषीमाल थेट मुंबईत पाठविला आहे. यामध्ये भाजीपाल्याची २८७, कांदा ४५ व ८२ टेम्पोंमधून फळे मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: coronavirus: All transactions in APMC closed, health check will be done from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.