coronavirus : एपीएमसी ठरतेय ‘कोरोना’ बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:20 AM2020-04-28T01:20:04+5:302020-04-28T01:20:20+5:30

सोमवारी फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला असून मार्केट आवारामध्ये भीतीचे वातावरण आहे.

coronavirus : The APMC is the ‘corona’ bomb | coronavirus : एपीएमसी ठरतेय ‘कोरोना’ बॉम्ब

coronavirus : एपीएमसी ठरतेय ‘कोरोना’ बॉम्ब

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा नियम धाब्यावर बसविण्यास सुरुवात झाली आहे. भाजीसह फळ मार्केटमध्ये गर्दी वाढू लागल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला असून मार्केट आवारामध्ये भीतीचे वातावरण आहे.
एपीएमसीतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने सुधारित नियमावली केली होती. गत आठवड्यात नियमांचे काही प्रमाणात पालन झाले. परंतु सोमवारी प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून भाजीपाला मार्केटमध्ये ३०७ व फळ मार्केटमध्ये तब्बल ५७९ ट्रक, टेम्पोंतून कृषीमालाची आवक झाली. भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. खरेदीदार, कामगार, व्यापारी व वाहतूकदारांनीही सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहावयास मिळाले. अनेकांनी मास्कचा वापर केला नव्हता. फळ मार्केटमध्येही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले.
फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुरक्षा अधिकारी अनेकांच्या संपर्कात आला असून त्या सर्वांचे क्वारंटाइन करण्याची मागणी होत आहे. एपीएमसीत गर्दीवर नियंत्रण मिळवले नाही तर अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून नियमांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
>भाजीमार्केटमधील व्यापाºयालाही लागण
एपीएमसीतील भाजी मार्केट ई विंगमधील व्यापाºयास कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यापारी व ग्राहकांनी काळजी घ्यावी असे आवाहन एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी केले आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा रक्षकास व भाजी मार्केटमधील व्यापाºयास कोरोना झाल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
>जबाबदार कोण : एपीएमसीतील पाच मार्केटमध्ये सोमवारी व्यापारी, कामगार, खरेदीदार, वाहतूकदार व इतर घटक मिळून दिवसभरात दहा हजारपेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती होती. अशीच गर्दी राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. रुग्ण वाढले तर त्याला जबाबदार कोण व आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.

Web Title: coronavirus : The APMC is the ‘corona’ bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.