Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:24 AM2020-07-01T00:24:38+5:302020-07-01T00:24:50+5:30
शहरातील १२ ठिकाणी लॉकडाऊन सुरूच
नवी मुंबई : महानगरपालिकेने कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या १२ ठिकाणी लॉकडाऊन करून विशेष आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. यानंतर आता प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर नोडल अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईमध्ये ४६ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत. यामधील ३४ ठिकाणी इमारतीमधील एखादा मजला किंवा झोपडपट्टीमधील दोन ते तीन झोपड्यांपुरताच कंटेनमेंट झोन आहे. उर्वरीत १२ ठिकाणी संपूर्ण सेक्टर किंवा विभागच विशेष कंटेनमेंट झान घोषीत केला असून तेथे पुन्हा लॉकडाऊन सुरू केला आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्र्मचारी वगळता इतरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. मेडीकल, दवाखाने व अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद केली आहेत.
महानगरपालिकेच्या पथकाने घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. नागरिकांमधील आॅक्सिजनची पातळी व तापमान तपासले जाते आहे. या मोहिमेचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अनेक कंटेनमेंट झोनला भेट देवून तेथील उपाययोजनांची पाहणी केली आहे. विशेष लॉकडाऊन नंतर आता पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी आठ विभागामध्ये समन्वय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाºयानावर त्या परिसरातील कोरोनाविषयी उपाययोजना व इतर गोष्टींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
नागरिकांना सहकार्याने आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लॉकडाऊन सुरू केला आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करत आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व मनपासह पोलीस प्रशासनासही सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
दोन दिवसांत अहवाल
कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास ५ ते १५ दिवसांचा वेळ लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
यामुळे मनपा रूग्णालयात आरटीई पीसीआर लॅब सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दोन दिवसात स्वॅब चाचणीचा अहवाल मिळेल याकडे लक्ष दिले जात आहे.