Coronavirus: लॉकडाउनमध्येही शहराला भिकाऱ्यांचा विळखा; कोरोना पसरण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:55 AM2020-05-07T01:55:15+5:302020-05-07T05:51:53+5:30
नवी मुंबईत मार्केटच्या ठिकाणी घोळक्याने मांडले ठाण
नवी मुंबई : मागील काही दिवसांत अचानक शहरातील भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे हे भिकारी मार्केट परिसरात ठाम मांडून बसत आहेत. त्यांच्याकडून भीक मागताना नागरिकांना जाणीवपूर्वक स्पर्श केला जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास ते कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही, याची पुरेपूर खबरदारी प्रशासन घेत आहे; परंतु लॉकडाउन लागल्यापासून हे भिकारी प्रशासनाकडून दुर्लक्षित झाले आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाशी, सानपाडा, नेरुळ येथील पुलाखालील जागा, घणसोली कोपरखैरणे येथील पुलाखाली तसेच इतर ठिकाणी भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांना समाजसेवकांकडून मुक्कामाच्या जागी जेवण मिळत होते; परंतु काही दिवसांपासून त्यांना मिळणारे जेवण बंद झाले आहे. यामुळे शहरातील ठिकठिकाणी भरणारे बाजार भिकाºयांचा अड्डा ठरू लागले आहेत. सकाळच्या वेळी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे साधून हे भिकारी त्या ठिकाणी जमत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना भीक देण्यास भाग पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जात आहेत. पादचाºयांचा हात पकडणे, लहान मुलांसह उभे राहून रस्ता अडवणे, असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारे दिवसभरात अनेकांना स्पर्श केला जात आहे. अशा वेळी त्यांना हटकल्यास भिकाºयांच्या टोळ्या तिथे जमा होत आहेत. यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
बेगर्स होममध्ये रवानगी करण्याची मागणी
नेरुळमध्ये काही मटण मार्केटच्या आवारात अशाच प्रकारे भिकारी नागरिकांना त्रास देत असल्याने कोरोना पसरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ मोरे यांनी व्यक्त केली आहे; परंतु प्रशासनाकडून या भिकाºयांच्या बंदोबस्त करण्याकडे कानाडोळा होत आहे.
परिणामी, हे भिकारी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास ते अनेकांना संसर्ग पसरवू शकतात. त्यांच्यापासून शहराला असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांची बेगर्स होममध्ये रवानगी करून शहर भिकाºयांच्या विळख्यातून सोडवण्याची मागणी होत आहे.