Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:25 PM2020-04-13T13:25:33+5:302020-04-13T13:36:51+5:30

Coronavirus : लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याप्रकरणी कामोठे शहरातील भाजपाचा पदाधिकारी हॅप्पी सिंगवर रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus BJP official files a violation of lockdown rules In Panvel SSS | Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next

पनवेल - दोन दिवसांपूर्वी पनवेलमधीलभाजपा नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केलं. वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केल्याचा ठपका ठेवत पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अशाच पद्धतीने लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याप्रकरणी कामोठे शहरातील भाजपाचा पदाधिकारी हॅप्पी सिंगवर रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॅप्पी सिंग यांच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात अवैध पद्धतीने औषध फवारणी करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत अज्ञात चार व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल केल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. राज्यात महारोगराई तसेच साथरोग म्हणून घोषित करण्यात आले. अशा अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्ते तसेच त्याच्या समेवत अज्ञात 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांनी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी घालून दिलेल्या नियम आणि आदेशाची आठवण व केलेल्या आव्हानाचे पत्र काढून नगरसेवक, समाजसेवक आणी राजकीय नेत्यांना घरात राहण्याचे आदेश देखील दिले होते.कोणीही सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली घराबाहेर पडू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील अशा स्पष्ट सूचना देऊन देखील हॅप्पी सिंग व त्याच्या साथीदारांनी पालिकेची परवानगी न घेता कामोठे शहरात अवैद्य औषध फवारणी केली. यासंदर्भात पालिकेचे सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी यांच्या सूचनेनुसार प्रभाग क चे स्वच्छता निरीक्षक भावेश चंदने यांनी यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविल्यानांतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूचे 22 रुग्ण आढळले आहेत. हे असताना देखील पनवेल महानगरपालिका हद्दीत काही समाजसेवक आणि राजकीय नेते, अन्न वाटप , भाजी वाटप करणाऱ्याच्या नावाखाली अवैध पद्धतीने जमाव करून आदेशाचे पायमल्ली करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

Web Title: Coronavirus BJP official files a violation of lockdown rules In Panvel SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.