coronavirus: क्वारंटाइन केंद्राची आयुक्तांकडून पाहणी,  इंडिया बुल्समध्ये कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 01:15 AM2020-05-12T01:15:35+5:302020-05-12T01:15:54+5:30

इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन स्वतंत्र इमारतींत प्रत्येकाला एक रूम याप्रमाणे १००० नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे.

coronavirus: Commissioner inspects quarantine center, instructs facilities at Covid Care Center in India Bulls | coronavirus: क्वारंटाइन केंद्राची आयुक्तांकडून पाहणी,  इंडिया बुल्समध्ये कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत निर्देश  

coronavirus: क्वारंटाइन केंद्राची आयुक्तांकडून पाहणी,  इंडिया बुल्समध्ये कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत निर्देश  

Next

नवी मुंबई : शहरात क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांना पनवेलजवळ इंडिया बुल्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात ठेवले जात आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह सोमवारी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. सुविधा पुरविताना काटकसर न करण्याचे निर्देश या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन स्वतंत्र इमारतींत प्रत्येकाला एक रूम याप्रमाणे १००० नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दुसºया स्वतंत्र इमारतीत पॉझिटिव्ह नागरिकांचा संपर्क आल्याने क्वारंटाइन करणे गरजेचे असलेल्या सर्वसाधारण नागरिकांना अलगीकरण करून राहण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर औषधोपचार करण्यात येत आहेत. येथील बाह्य रुग्ण तपासणी कक्षात डॉक्टरांनी २४ तास उपस्थित राहावे व तेथील पॉझिटिव्ह आणि क्वारंटाइन व्यक्तींशी दूरध्वनी व सुरक्षेची काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळून संपर्कात राहावे, असे आयुक्तांनी निर्देश दिले.
दुसºया स्वतंत्र इमारतीत केवळ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. या सर्वसाधारण व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने औषधांची आवश्यकता नाही. तथापि क्वारंटाइन व्यक्तींचा आमच्यावर कोणताही औषधोपचार केला जात नाही, असा समज झाला असून त्यांना औषधोपचाराची आवश्यकता नाही, ही वस्तुस्थिती समजवून सांगण्याच्या सूचना आयुक्तांनी डॉक्टरांना दिल्या. तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींप्रमाणेच क्वारंटाइन केलेल्या नागरिकांशीही संवाद साधत राहावे, असे आयुक्तांनी सूचित केले.
रविवारी रात्री इंडिया बुल्स येथून कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होऊन बरे झालेल्या ८० व्यक्तींना तसेच त्यांच्यासोबत क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेल्या ३०३ अशा एकूण ३८३ नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी करून एनएमएमटी बसेसमधून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत घरी पाठविण्यात आले आहे. त्याचाही आढावा आयुक्त मिसाळ यांनी घेतला.
आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त होऊन बरे झालेल्या १५५ व्यक्ती घरी परतल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक नागरिकाची व त्यातही विशेषत्वाने लहान मुलांची काळजी घ्यावी, असे सूचित करून सुविधा पुरविताना कोणत्याही प्रकारची काटकसर करू नये, असे सक्त निर्देश मिसाळ यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. इंडिया बुल्स या ठिकाणी नाश्ता, दोन वेळचे जेवण, दोन वेळा चहा व बिस्किटे तसेच मुलांना दूध व फळे नियमित देण्यात यावीत तसेच स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

Web Title: coronavirus: Commissioner inspects quarantine center, instructs facilities at Covid Care Center in India Bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.