Coronavirus: पनवेल महानगरपालिकेत कोरोनाचे 16 रुग्ण, तर उलवेमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:59 PM2020-04-06T18:59:59+5:302020-04-06T19:01:26+5:30
पनवेलमधील रुग्णांमध्ये 11 सीआयएसएफ जवान व 5 इतर नागरिकांचा समावेश आहे.
पनवेल:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. तर नव्याने उलवे नोडमध्ये 4 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या चौघांना उपजिल्हा रुग्णालय (कोविड 19 जिल्हा रुग्णालयात )ठेवण्यात आले आहे. पनवेलमधील रुग्णांमध्ये 11 सीआयएसएफ जवान व 5 इतर नागरिकांचा समावेश आहे.
उलवे येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतर तीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. या रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवले होते. त्यापैकी तिघांना संसर्ग झाले असल्याचे नवले यांनी यावेळी स्पष्ट केले. सद्यस्थितीमध्ये पनवेल मनपा शहर हद्दीतील 16 आणि ग्रामीणमधील 4 चार अशा 20 रुग्णांची नोंद झालेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच घराबाहेर पडू नका, असे अवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शेकडो नागरिक अद्याप होम कोरंटाईन मध्ये आहेत.