नवी मुंबई - नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराचा सोमवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. ते सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. दरम्यान लॉकडाऊन मुळे ते ऐरोली परिसरात बंदोबस्तावर होते.नवी मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. यामुळे पोलिसांकडून हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 200 च्या वर गेली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्या कोरोना योध्याचा बळी गेला नव्हता. मात्र सोमवारी एका 45 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ते सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. तर रबाळे येथील पोलीस कॉलनीत सहकुटुंब रहायला होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह आई व पत्नीला कोरोना झाल्याने उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने वाशीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी संध्याकाळी त्यांची प्राणजोत मावळली. नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!
बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता
कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत