Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 07:10 PM2020-04-07T19:10:10+5:302020-04-07T19:10:30+5:30

15 फूट लांब यंत्रामुळे मार्केट मध्ये येणा-या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. 

Coronavirus : Creation of sanitizer stations in APMC; Sterilize everyone who comes to the vegetable market | Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण 

Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण 

Next

नवी मुंबई  - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे.  15 फूट लांब यंत्रामुळे मार्केट मध्ये येणा-या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. भाजीपाला मार्केटच्या आवक गेटवर हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. मार्केटमध्ये येणा-या प्रत्येकाला या 15 फूट लांब स्टेशनमधून यावे लागणार आहे. यामध्ये आलेले व्यक्तीच्या अंगावर सॅनिटायझरचे तुषार उडणार असून पूर्णपणे  निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच प्रत्येक नागरिकाला मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.  एपीएमसीच्या ऊर्वरित चार मार्केटमध्ये ही सॅनेटायझर स्टेशन लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: Coronavirus : Creation of sanitizer stations in APMC; Sterilize everyone who comes to the vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.