Coronavirus: तीन महिन्यांचे वीजबिल ग्राहकांना काही टप्प्यांत भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:28 AM2020-06-28T01:28:32+5:302020-06-28T01:28:51+5:30

तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती

Coronavirus: Customers can pay three months electricity bill in a few steps | Coronavirus: तीन महिन्यांचे वीजबिल ग्राहकांना काही टप्प्यांत भरता येणार

Coronavirus: तीन महिन्यांचे वीजबिल ग्राहकांना काही टप्प्यांत भरता येणार

Next

नेरळ : लॉकडाऊनमुळे गेले अडीच ते तीन महिने अनेकांच्या हाताला काम नाही, असे चित्र सगळीकडे असताना आता अनलॉकनंतर महावितरणच्या आलेल्या तीन महिन्यांच्या एकत्र बिलामुळे ग्राहकांना शॉक बसला आहे.

बिलाचा आकडा हा हजारोंच्या घरात असल्याने एवढे बिल भरणार कसे, असा प्रश्न वीजग्राहकांसमोर आहे. दरम्यान, या बिलात ग्राहकांना सहकार्य करणार असल्याचे आश्वासन महावितरणचे कर्जत येथील उपअभियंता आनंद घुले यांनी दिले आहे.

लॉकडाऊनमुळे महावितरणकडून महिन्याला घेतले जाणारे ग्राहकांचे रीडिंग घेणे बंद झाले. त्यामुळे महिन्याला सरासरी बिल यायला लागले. अनेक ग्राहकांनी या काळात तेही बिल भरले नाही. याच काळात चक्रीवादळाने लोकांना अजूनच हतबल करून टाकले. जिल्ह्यातल्या अनेक भागांत आजही लाइट नाही. त्यात आता शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने हळूहळू सर्व पाहिल्यासारखे होत आहे.

मात्र, तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती. ग्राहकांना वाढीव बिल आल्यास त्यावेळी ग्राहकांसोबत मनसे रस्त्यावर उतरेल, असे लेखी निवेदनही मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी महावितरणला दिले होते. महिन्याच्या १ तारखेपासून रीडिंग प्रोग्राम सुरू केला आहे. यात जी बिले आलेली आहेत, ती तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळातील रीडिंगनुसार आहेत. त्यातही ज्यांनी सरासरी बिलाची रक्कल लॉकडाऊन काळात भरलेली आहे, तीही या बिलात वजा केली आहे. यात घरघुती वीजग्राहकांना स्लॅब बेनिफिट दिले आहेत. काही टप्प्यात बिल भरण्याची तरतूद करण्यात आल्याचे महावितरण कर्जत उपविभागाचे उपअभियंता आनंद घुले यांनी सांगितले आहे.

Web Title: Coronavirus: Customers can pay three months electricity bill in a few steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.