कोरोनाने देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनाच्या कचाट्यातून सण, समारंभही सुटलेले नाहीत. या महामारीचा गोकु ळाष्टमी उत्सवावरही परिणाम झाला आहे. दरवर्षी थाटामाटात साजरा होणार हा उत्सव यंदा अवघ्या पाच माणसांच्या उपस्थितीत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ७०० दहीहंड्यांसह मिरवणुकाही रद्द कण्यात आल्या आहेत, तर नवी मुंबईतीलही लाखमोलाच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.- अनंत पाटील नवी मुंबई : या वर्षी दहीहंडी उत्सवाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी दहीहंडी उत्सव समित्यांनी या वर्षीच्या दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिघा ते बेलापूर परिसरातील अनेक मंडळांनी लाखो रुपये पारितोषिके असलेल्या दहीहंडींचा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे. एकंदर परिस्थिती पाहता, यंदा गोविंदांची घागर उताणीच राहण्याची चिन्हे आहेत.बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा परिसरातील गावठाण आणि नोड्समध्ये गोपाळकाल्याचा जल्लोष असतो. गोविंदा पथके वाजत-गाजत, दहीहंडी फोडत शहरभर फिरत असतात. मात्र, या उत्सवावर यंदा कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. ऐरोली सेक्टर १५ येथे श्री इच्छापूर्ती गणपती मंदिर चौकात दरवर्षी सुनील स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ११ लाखांची नवी मुंबईतील सर्वांत मोठ्या बक्षिसाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेलापूर आयकर कॉलनी सेक्टर २१ आणि २२ येथे श्री गणेश स्पोटर््स क्लबच्या वतीने आयोजित होणारी एक लाखाचे पारितोषिके असलेली दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. कोपरखैरणे सेक्टर १० येथील जिजाऊ कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, घणसोली गावातील संस्कार मित्रमंडळाची १ लाखाची पारितोषिक असलेली दहीहंडी रद्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अंकुश नाईक यांनी दिली.ब्रिटिश राजवटीत १९०२ साली शिनवार कमळ्या पाटील यांनी ब्रिटिशांना न जुमानता, राहत्या घरी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला होता आणि आजमितीस ११८ वर्षांची दहीहंडीची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालन करून यंदा बच्चे कंपनीच्या हस्ते चार ते पाच फुटांच्या उंचीवर दहीहंडी बांधणार आहोत.- भानुदास पाटील, चौथे वंशज (स्व. शिनवार पाटील), घणसोलीकोरोनामुळे नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे, तसेच आदिवासी पाड्यातील गरजूंना अन्नधान्य वाटप, निर्जंतुकीकरण आदी मदतकार्यामध्ये अनेक संस्था काम करीत आहेत. त्याच धर्तीवर गेल्या चार महिन्यांपासून गरजूंना मदत करण्याचे काम सुरू आहे. उत्सव दरवर्षीच होतो, पण आता मदतीचा हात देण्याची गरज आहे.- सरोज पाटील, माजी नगरसेविका, आग्रोळी, बेलापूरगर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी आम्ही ११ लाखांची पारितोषिके असलेली दहीहंडी यंदा रद्द केली आहे. या संदर्भात सरकार जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे.- विजय चौगुले, अध्यक्ष सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशन, ऐरोली
CoronaVirus News: यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच; मिरवणुकाही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:48 AM