शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:56 AM

Coronavirus : दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भी‌तीचे वातावरण निर्माण झाले होते.

नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य विभागास यश येऊ लागले आहे. शहरातील शिल्लक रुग्णांची संख्या १६०५ वरून १३३४ झाली आहे. मृत्युदरही नियंत्रणात आला असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २६३ दिवसांवरून ३५७ दिवसांवर गेले आहे.    दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भी‌तीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे व नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे दुसरी लाट थाेपविण्यात यश येऊ लागले आहे.नोव्हेंबरमध्ये ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ३७३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. पॉझिटिव्हिटी रेट ५.१२ टक्के एवढा होता. १ ते १० डिसेंबर दरम्यान ३१,६४५ चाचण्या करण्यात आल्या असून ११३६ रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हीटी रेट ३.५८ झाला आहे. मृत्यूचे दर २.२ टक्क्यांवर नियंत्रित करण्यात यश आले आहे. नोव्हेंबरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून २६३ दिवसांवर आला होता. सद्य:स्थितीमध्ये हा कालावधी ३५७ दिवसांवर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये फक्त ३.३२ टक्के रुग्णच शिल्लक आहेत.कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर, सतत हात धुणे व सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई