शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Coronavirus : मुलीच्या अखेरच्या दर्शनालाही मुकला पिता; लॉकडाऊनमुळे सर्वच मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:58 PM

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा ते अलाहाबाद (उत्तर प्रदेश) जाणार असतानाच लॉकडाऊनमुळे ते वाशीतच अडकले होते. अशातच त्यांच्यापर्यंत मुलीच्या निधनाची बातमी पोहोचली. 

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनानं लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे एक पिता आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचे अखेरचेदेखील दर्शन घेऊ शकलेला नाही. वाशीतील अब्दुल जिलानी यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा ते अलाहाबाद (उत्तर प्रदेश) जाणार असतानाच लॉकडाऊनमुळे ते वाशीतच अडकले होते. अशातच त्यांच्यापर्यंत मुलीच्या निधनाची बातमी पोहोचली. वाशी येथे खासगी नोकरी करणारे अब्दुल जिलानी हे मूळचेअलाहाबादचे (उत्तर प्रदेश)राहणारे असून, तीन महिन्यांपूर्वी त्यांना कन्यारत्न झाले होते. पत्नी पाच महिन्यांची गरोदर असताना ते प्रसूतीसाठी पत्नीला गावी सोडून आले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाल्यानंतर ते मार्च महिन्याच्या अखेरीस पत्नी व नवजात मुलीच्या भेटीला जाणार होते. तत्पूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन झाल्याने ते नवी मुंबईतच अडकून पडले. यानंतरही लॉकडाऊन उठल्यानंतर गावी येतो, असे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याचा निरोप गावावरून आला. परंतु लॉकडाऊनमुळे अब्दुल यांचा नाईलाज झाला होता. त्यातही ते मुलीची प्रकृती लवकरच ठीक होईल व लवकरच आपण गावी जाऊ अशा आशेवर होते. परंतु चार दिवसांपूर्वी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच त्यांना जबर धक्का बसला. यावेळी मुलीच्या अंतिम दर्शनासाठी गावी जाण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केले. परंतु काही ठिकाणावरून त्यांची मागणी फेटाळण्यात आली. तर काही ठिकाणी परवानगी मिळून देखील गावापर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्गच बंद असल्याने त्यांना मुलीचे अंतिम दर्शन देखील घेता आले नाही. अखेर इलाहाबाद येथे पित्याच्या पश्च्यात चिमुकलीचा अंत्यविधी उरकण्यात आला. तर अनपेक्षित पणे त्यांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस