coronavirus: नवी मुंबईत कोरोनामुळे झाला चौघांचा मृत्यू, एका दिवशी वाढले ७४ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:07 AM2020-05-16T05:07:33+5:302020-05-16T05:07:37+5:30
नवी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारे व एपीएमसी मधील भाजी व्यापारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तुर्भे सेक्टर २०, कोपरखैरणे सेक्टर १२ व घणसोलीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा एक हजारचा टप्पा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी ७४ नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या १०४८ झाली आहे. एपीएमसीमधील व्यापाऱ्यासह एकूण चौघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारे व एपीएमसी मधील भाजी व्यापारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तुर्भे सेक्टर २०, कोपरखैरणे सेक्टर १२ व घणसोलीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाशी सेक्टर १५ मधील रहिवासी व एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये काम करणाºया व्यक्तीचाही मृत्यू झाला असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. शुक्रवारी दिवसभरात कोपरखैरणेत १९, नेरूळमध्ये १८, तुर्भेत १४, घणसोलीत १३, बेलापूर, ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. शहरात दिवसभरात १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २७२ रूग्ण बरे झाले आहेत. मनपा क्षेत्रात अद्याप ९४८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
उरण-करंजातील रुग्णसंख्या १०१
उरण : उरण - करंजामध्ये शुक्रवारी आणखी तीन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १०१ झाली आहे. तर ६२ संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले आहेत. गुरुवारी संध्याकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या करंजा परिसराची रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व कोकण आयुक्तांनी पाहणी केली.