CoronaVirus : नवी मुंबईमधील चार विभाग रेड झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:26 AM2020-04-26T00:26:26+5:302020-04-26T00:26:38+5:30

नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

CoronaVirus : Four divisions in Navi Mumbai in Red Zone | CoronaVirus : नवी मुंबईमधील चार विभाग रेड झोनमध्ये

CoronaVirus : नवी मुंबईमधील चार विभाग रेड झोनमध्ये

googlenewsNext

नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरात आतापर्यंत १०८ रुग्ण आढळले आहेत. आठपैकी चार विभाग कार्यालय परिसर रेड झोनमध्ये असून सर्वाधिक २२ रुग्ण वाशीत आढळले आहेत. नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. फिलिपाइन्सवरून आलेल्या विदेशी नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याचे सहकारी व सानिध्यात आलेल्या नागरिकासही कोरोना झाला. एक महिना रुग्ण वाढीचा वेग कमी होता; परंतु गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
शनिवारी पाच नवीन रुग्ण आढळले असून कोपरखैरणेत दोन, वाशी, तुर्भे व घणसोलीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोपरखैरणेमध्ये २०, बेलापूरमध्ये १८ व नेरुळमध्ये १६ रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीमध्ये १२, तुर्भेत ९, घणसोलीत ८ व दिघ्यात ३ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने २४ ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत.
नवी मुंबईमधील वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट बनली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका यांना प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अत्यावश्यक सेवेतील अनेकांना लागण झाली आहे. महानगरपालिकेने साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचेही कोविड-१९ मध्ये रूपांतर केले आहे. फ्ल्यू क्लिनीक सुरू केले आहेत. रुग्ण सापडलेल्या परिसराचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे. पोलिसांनीही लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे; परंतु यानंतरही अनेक नागरिक लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असून त्यामुळेच साथ नियंत्रणात आणण्यात अपयश येऊ लागले आहे.
>1116 रिपोर्ट निगेटिव्ह
महापालिका क्षेत्रात दीड महिन्यांत तब्बल १,८१२ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,११६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ५८८ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
>२७ रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत २७ जणांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. घणसोलीमधील कोरोना झालेल्या महिलेची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात व दोघांचाही जीव वाचविण्यात यश आले आहे.
>झोपडपट्टीतही आढळले रुग्ण
दिघा ते बेलापूर दरम्यान ५० पेक्षा जास्त ठिकाणी झोपडपट्टी आहे. दोन दिवसापूर्वी नेरुळ शिवाजीनगर झोपडपट्टीत, तर शनिवारी इंदिरानगर झोपडपट्टीत कोरोना रुग्ण सापडला आहे.

Web Title: CoronaVirus : Four divisions in Navi Mumbai in Red Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.