शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

CoronaVirus : नवी मुंबईमधील चार विभाग रेड झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:26 AM

नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरात आतापर्यंत १०८ रुग्ण आढळले आहेत. आठपैकी चार विभाग कार्यालय परिसर रेड झोनमध्ये असून सर्वाधिक २२ रुग्ण वाशीत आढळले आहेत. नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. फिलिपाइन्सवरून आलेल्या विदेशी नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याचे सहकारी व सानिध्यात आलेल्या नागरिकासही कोरोना झाला. एक महिना रुग्ण वाढीचा वेग कमी होता; परंतु गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.शनिवारी पाच नवीन रुग्ण आढळले असून कोपरखैरणेत दोन, वाशी, तुर्भे व घणसोलीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोपरखैरणेमध्ये २०, बेलापूरमध्ये १८ व नेरुळमध्ये १६ रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीमध्ये १२, तुर्भेत ९, घणसोलीत ८ व दिघ्यात ३ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने २४ ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत.नवी मुंबईमधील वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट बनली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका यांना प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.अत्यावश्यक सेवेतील अनेकांना लागण झाली आहे. महानगरपालिकेने साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचेही कोविड-१९ मध्ये रूपांतर केले आहे. फ्ल्यू क्लिनीक सुरू केले आहेत. रुग्ण सापडलेल्या परिसराचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे. पोलिसांनीही लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे; परंतु यानंतरही अनेक नागरिक लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असून त्यामुळेच साथ नियंत्रणात आणण्यात अपयश येऊ लागले आहे.>1116 रिपोर्ट निगेटिव्हमहापालिका क्षेत्रात दीड महिन्यांत तब्बल १,८१२ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,११६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ५८८ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.>२७ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबईमध्ये आतापर्यंत २७ जणांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. घणसोलीमधील कोरोना झालेल्या महिलेची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात व दोघांचाही जीव वाचविण्यात यश आले आहे.>झोपडपट्टीतही आढळले रुग्णदिघा ते बेलापूर दरम्यान ५० पेक्षा जास्त ठिकाणी झोपडपट्टी आहे. दोन दिवसापूर्वी नेरुळ शिवाजीनगर झोपडपट्टीत, तर शनिवारी इंदिरानगर झोपडपट्टीत कोरोना रुग्ण सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस