माथेरान : सध्या संपूर्ण जगभर कोरोनासारख्या विषाणूने हाहाकार माजविला असून आपल्या भारत देशाला लॉकडाउनचा निर्णय लागू करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये खरोखरच ज्यांचं हातावर पोट आहे, परगावातील व परराज्यातील मोलमजुरी करण्याकरिता आलेल्या मंडळींना, तसेच स्थानिक मोलमजुरी करणाºया व्यक्तींना याची झळ सोसावी लागत आहे. ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन माथेरान शहरात अडकलेले मजूर, कामगार, हातरिक्षाचालक आणि शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीकरिता माथेरान शिवसेना शहर शाखेच्या वतीने गुरुवार १६ एप्रिलपासून लॉकडाउन संपुष्टात येईपर्यंत रोज एक वेळ दुपारी १२-३० ते २-३० या कालावधीमध्ये शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या सौजन्याने मोफत शिवभोजन सुरू करण्यात आले आहे.सध्याच्या परिस्थितीनुसार केंद्रशासन आणि राज्य शासन यांच्या वतीने लागू करण्यात आलेल्या निबंर्धांचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत व सर्व गरजू व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायला सुरुवात केली आहे.जवळपास दोनशे पेक्षाही अधिक गरजवंतांनी शिव भोजनाचा लाभ घेत आहेत. सर्वत्रच लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे अनेकजण इथे अडकून पडले आहेत यामध्ये हॉटेल कामगार, हातरीक्षा चालक, हमाल तसेच अन्य मोलमजुरी करणाºया श्रमिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याकामी मीरा फाउंडेशन अध्यक्ष चंद्रकांत चौधरींचा यांनी शिवसेना शाखेच्या माध्यमातून अशा असंख्य गोरगरीब त्याचप्रमाणे हातावर पोट असणाºया श्रमिकांना एकवेळ जेवणाची सोय आपल्या हॉटेल कृष्णामध्ये करून त्यांना दिलासा दिला आहे.कोरोनाचे महासंकट सुरू झाले तेव्हा चंद्रकांत चौधरी यांनी गावातील सर्व नागरिकांना एकूणच ९५० कुटुंबांना मोफत भाजीपाला पुरविला होता तर माथेरानची शान समजले जाणारे घोडे या कठीण प्रसंगी उपाशी पोटी राहू नयेत यासाठी एकूण १७५ गोणी मोफत पशु खाद्य पुरविले आहे. एवढ्यावरच न थांबता गावातील अथवा अन्य मोलमजुरी करणाºयासाठी आलेले कुणीही नागरिक उपाशी राहू नयेत यासाठी मोफत अन्नदान करण्यास सुरुवात केली आहे.- प्रदीप घावरे, माजी नगरसेवक
CoronaVirus: माथेरानमध्ये गोरगरिबांना मोफत शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:06 AM