- नामदेव मोरे नवी मुंबई : पालिका कार्यक्षेत्रातील सरकारी कार्यालयांना नियमांचा विसर पडला आहे. कार्यालयांमध्ये येणाऱ्यांचे तापमान तपासले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नसून, मास्कही फक्त औपचारिकता म्हणून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांची गर्दी असणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती, आरटीओ कार्यालय, पोलीस स्टेशन, पालिकेचे विभाग कार्यालय व इतर सर्व ठिकाणी नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असणाऱ्या सरकारी कार्यालयांमध्ये उदासीनता असल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजारसमिती मुख्यालय थर्मल गनचा वापर केला जात नाही. गेटवर सुविधा आहे, पण अंमलबजावणी नाही. मुख्यालय व इतर सर्व कार्यालयांमध्ये सॅनिटायझर स्टँड आहेत, पण वापर कमी. कार्यालयात मास्कचा वापर होत आहे, पण मार्केटमध्ये प्रमाण कमी. एपीएमसी पोलीस स्टेशनपोलीस स्टेशन व उपआयुक्त कार्यालयात थर्मल गनचा वापर नाही. पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर स्टँड ठेवलेला नाही. कर्मचारी व भेटण्यासाठी येणाऱ्यांकडून मास्क वापरला जातो. आरटीओ कार्यालय आरटीओ कार्यालयात येणाऱ्यांची तापमान मोजणी केली जात नाही. सॅनिटायझर स्टँड ठेवला आहे, पण सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. मास्कचा वापर केला जात आहे. कामानिमित्त येणारेही मास्कचा वापर करतात. मनपा विभाग कार्यालय महानगरपालिका विभाग कार्यालयामध्ये थर्मल गनचा वापर नाही. नेरुळ विभाग कार्यालयामध्ये सॅनिटायझरचा वापर होत नाही. मास्क वापरण्याच्या नियमांचीही अंमलबजावणी केली जात नाही.