Coronavirus: नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या सावटाखाली; महापालिकेतील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:18 AM2020-05-09T02:18:57+5:302020-05-09T02:19:13+5:30

नागरी आरोग्यकेंद्रातील कर्मचारीदेखील कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर कर्मचाºयांच्या संपर्कात आल्याने गुरुवारी त्यांच्यादेखील तपासण्या करण्यात आल्या.

Coronavirus: Health system in Navi Mumbai under coronavirus; 11 employees of NMC are positive | Coronavirus: नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या सावटाखाली; महापालिकेतील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह

Coronavirus: नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या सावटाखाली; महापालिकेतील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा व्हायला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध नागरी आरोग्य केंद्रातील ११ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आणि कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली असून अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

रबाळे येथील नागरी आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. नेरुळ येथील नागरी आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी सर्व्हे करताना शिवाजीनगर येथील एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते. सदर व्यक्ती शहराबाहेरून आली असल्याने त्यांना क्वॉरंटाइन करून कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाºयांचीही तपासणी करण्यात आली. तपासणी झाल्यानंतर सदर सर्व कर्मचारी नागरी आरोग्यकेंद्रात नियमित कामे करीत होते. तपासणीचा अहवाल तब्बल सहा दिवसांनी प्राप्त झाला. त्यामध्ये एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सहा दिवस एकत्र काम केल्याने नागरी आरोग्यकेंद्रातील सर्व २० कर्मचाºयांची रविवार, ३ मे रोजी पुन्हा तपासणी करण्यात आली. याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यामध्ये तब्बल आठ आरोग्य कर्मचाºयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ११ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरी आरोग्यकेंद्रातील कर्मचारीदेखील कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर कर्मचाºयांच्या संपर्कात आल्याने गुरुवारी त्यांच्यादेखील तपासण्या करण्यात आल्या. कोरोनाशी झुंजणारा तसेच नागरिकांना आरोग्य सुविधा देणारे कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने इतर कर्मचºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाºयांच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले आदीच्या आरोग्याची सुरक्षा धोक्यात आली आहे.

‘विशेष सुविधा उपलब्ध करून उपचार करावेत’
आरोग्य कर्मचाºयांना कोरोनाची लागण होणे गंभीर बाब आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा देणाºया कर्मचाºयांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास महानगरपालिकेने शहरातील मोठी हॉटेल्स तसेच वाशी रेल्वे स्थानकाशेजारील विविध राज्यांना दिलेले भवन आदी ठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून उपचार करावेत. ज्यामुळे कर्मचारी लवकर बरे होऊन पुन्हा सेवेत रुजू होतील. याबाबत महापालिका आयुक्त आणि शासनाकडेदेखील पत्रव्यवहार केला असल्याची माहितीइंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली आहे.

Web Title: Coronavirus: Health system in Navi Mumbai under coronavirus; 11 employees of NMC are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.