कर्जत : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारी कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक झाला असून, २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. त्यामध्ये एका पोलीस शिपायाचा व आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यापूर्वी २ आॅगस्ट रोजी २५ रुग्ण आढळले होते.शुक्रवारी कर्जत पोलीस ठाण्यातील एका ३६ वर्षांच्या पोलीस शिपायाचा आणि एका ५० वर्षीय आरोग्य सेवकाचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील मुद्रे बुद्रुकमधील एका ७६ वर्षीय वयस्कर व्यक्तीचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महावीर पेठेतील एका ५९ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. भिसेगावमधील ५२ वर्षांच्या व्यक्तीचा, तर दहिवली शिवाजीनगरमधील ६० वर्षांच्या महिलेचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डीकसळ येथील एका २८ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असून, यापूर्वी त्याचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह होते. नेरळ राजेंद्र गुरुनगरमधील एका ५९ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. नेरळमधील एका ५४ वर्षांच्या महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला अंगणवाडी सेविका आहे.धामोते येथील ६७ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याच्या ६२ वर्षांच्या पत्नीला व २६ वर्षीय युवतीलाही कोरोनाची लागण झाली असून, धामोतेमधीलच एका ५३ वर्षांची व्यक्तीही कोरोनाबाधित आहे. शिरसे येथील ३७ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे.सालवड येथील ५९ वर्षांची व्यक्ती, ३७ व ३३ वर्षांचे युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोंदिवडे येथील ३३ वर्षांचा युवक व नांगुर्ले येथील ३८ वर्षांच्या महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वांजळे येथील ४८ व ३५ वर्षांच्या महिलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.पुलाची वाडी येथील ३९ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोदिवले येथील ३६ वर्षांची महिला व मिरचोली येथील ३० वर्षांची युवती कोरोनाबाधित झाली आहे. चिंचवली येथील ५२ वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आसल येथील एका ३४ वर्षांच्या महिलाही कोरोनाबाधित झाली आहे. नेरळ येथील २३ वर्षीय युवतीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चोरवळे येथील एका २७ वर्षांच्या युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.एकूण रुग्णसंख्या ९५६आजपर्यंत तालुक्यात ९५६ रु ग्ण आढळले असून, ७५६ रु ग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. शुक्रवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४३ झाली आहे. आज कर्जत शहरातील रुग्ण संख्या कमी असून, कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात वाढला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
coronavirus: कर्जतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:35 AM