शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:43 AM

नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागला आहे.

नवी मुंबई - शासनाच्या सूचनेनंतर महानगरपालिकेनेही नवी मुंबईमधील मॉल्स व हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमागृह, तरण तलाव, बार, आॅडिटोरिअम बंद ठेवले जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी मॉल्स व दुकानांसमोरही गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागला आहे. महानगरपालिकेने यापूर्वी मॉल्स व हॉटेल वगळता इतर सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. बुधवारपासून मॉल्सही सुरू केले आहेत. वाशी, सीवूडसह शहरातील बहुतांश मॉल्स पुन्हा सुरू झाले आहेत, परंतु पहिल्याच दिवशी नागरिकांची तुरळक उपस्थिती होती. मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणाऱ्यांनाच आतमध्ये सोडले जात होते. सर्वांचे तापमानही तपासले जात होते. मॉल्स सुरू झाल्यामुळे तेथील कामगार व दुकान चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.शहरातील हॉटेल्सही सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. आता हॉटेलमध्ये बसण्यासही परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असले, तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. प्रति दिन ३०० ते ४०० नवीन रुग्ण वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे. मॉल्स व दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.महानगरपालिकेने नागरिकांसाठी केलेल्या सूचनासार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक राहील.सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे.लग्नकार्यासाठी ५० पेक्षा जास्त व अंत्यविधीसाठी २०पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थित राहू नये.सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई.जास्तीतजास्त अस्थापनांनी वर्क फ्रॉम होमला पसंती द्यावी.कामाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याची व्यवस्था, सॅनेटायजरची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.ज्येष्ठ नागरिकांना आवाहनज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर महिलांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. यामुळे या सर्वांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.वाहतुकीसाठी नियम पुढीलप्रमाणेमनपा क्षेत्रात टॅक्सीमधून चालकासह एकूण चार प्रवासी, रिक्षामध्ये दोन प्रवासी, चारचाकी वाहनांमध्ये चार व दुचाकीवरून दोन प्रवाशांनीच प्रवास करणे बंधनकारक आहे. वाहतुकीसाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेलNavi Mumbaiनवी मुंबई