coronavirus: क्वारंटाइन केंद्रात घुसमट, पनवेलमधील इंडिया बुल्स सेंटरमध्ये जमावाकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:21 AM2020-05-11T02:21:36+5:302020-05-11T02:22:02+5:30

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

coronavirus: Infiltration at quarantine center, outrage at India Bulls center in Panvel | coronavirus: क्वारंटाइन केंद्रात घुसमट, पनवेलमधील इंडिया बुल्स सेंटरमध्ये जमावाकडून संताप

coronavirus: क्वारंटाइन केंद्रात घुसमट, पनवेलमधील इंडिया बुल्स सेंटरमध्ये जमावाकडून संताप

Next

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - शहरातील कोरोनाचा विळखा वाढतच आहे. गेल्या दहा दिवसात रोज ४० ते ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे क्वारंटाइन रुग्णांची संख्या ९०० च्या घरात पोहोचलेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होण्याचे प्रमाण अल्प असल्याने अनेकांचा क्वारंटाइन कालावधी वाढतच चालला आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ इतकी झाली आहे. तर १०७१ जणांना क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. वर्गवारीनुसार वाशी व पनवेलच्या इंडिया बुल्स येथे त्यांची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, पॉझिटिव्ह आलेल्या मात्र कसलाही त्रास नसलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची संख्या ६०० च्या घरात होती.

गेल्या दहा दिवसांत त्यात सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी, क्वारंटाइन केंद्रात असलेल्यांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. तर ८,३९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत केवळ ७५ पॉझिटिव्ह रुग्ण दुसऱ्या व तिसºया चाचणीत पूर्णपणे निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत.

क्वारंटाइन केंद्रातील बहुतांश व्यक्तींचा कालावधी वाढत चालला आहे. यामुळे अनेक जण एक महिन्याहून अधिक कालावधीपासून बंदिस्त आहेत. १४ दिवसांनी त्यांची टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये निगेटिव्ह आल्यानंतरही दुसरी टेस्ट घेण्यासाठी पुढील पाच ते सात दिवसांसाठी तिथेच ठेवले जात आहे.
दुसºया टप्प्यातील चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे. तर दुसºया चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी ठेवले जात आहे.

काही जणांची चौदाव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यानंतर पाच ते सात दिवसांनी घेतली जाणारी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचा कालावधी वाढला आहे. कुटुंबातील इतरांना अथवा राहत्या परिसरातील व्यक्तींना टाळण्यासाठी त्यांचे क्वारंटाइन सेंटरमध्ये अलगीकरण होत आहे.
महिन्याभराहून अधिक कालावधी उलटल्याने अनेकांना घरचा रस्ताच बंद झाल्याची भीती सतावत आहे. तर आपला रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही तिथे ठेवल्याने पुन्हा कोरोना होईल, अशी भीतीही काहींना वाटत आहे. क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींना त्यांचा कालावधी वाढत असण्यामागची कारणे पटवून देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कुटुंबापासून एकाकी पडलेल्यांची घुसमट होत आहे.
शहरातील क्वारंटाइन व्यक्ती व पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.

च्पनवेलच्या इंडिया बुल्स येथे क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी इमारतीखाली जमाव जमवून संताप व्यक्त करीत
तत्काळ घरी सोडण्याची मागणी केली.
च्अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन दिवसांपूर्वी सीबीडीतील एका व्यक्तीने क्वारंटाइन कालावधी वाढल्याने पळ काढला होता.

Web Title: coronavirus: Infiltration at quarantine center, outrage at India Bulls center in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.