Coronavirus : इराणचे मालवाहू जहाज दहा दिवसांपासून समुद्रात उभे, जेएनपीटीत रेड सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:44 AM2020-03-17T02:44:31+5:302020-03-17T02:45:10+5:30

देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

Coronavirus : Iran's cargo stand at sea form ten days, red signal in JNPT | Coronavirus : इराणचे मालवाहू जहाज दहा दिवसांपासून समुद्रात उभे, जेएनपीटीत रेड सिग्नल

Coronavirus : इराणचे मालवाहू जहाज दहा दिवसांपासून समुद्रात उभे, जेएनपीटीत रेड सिग्नल

Next

उरण : इराणहून अमोनिया रसायनाने भरलेल्या जहाजाला जेएनपीटीने बंदरात येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दहा-बारा दिवसांपासून समुद्रात नांगरून ठेवण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. या बंदरात जगभरातून मालवाहू जहाजे येतात. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची दखल घेऊन चीनमधून येणाºया जहाजांना जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या (पीएचओ) परवानगीनंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते. मात्र जहाजावरील एकाही कर्मचाºयाला बंदरात उतरू दिले जात नाही. दिवसात किती जहाजे आली, किती रवाना झाली आणि जहाजांवरील किती कर्मचाऱ्यांची तपासणी केली, त्याचा संपूर्ण तपशीलही केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो, अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकाºयांनी दिली.

कोरोनाबाधित देशांचा तपशील जेएनपीटी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा कोरोनाबाधित देशातून येणाºया जहाजांना १५ दिवस बंदरात येण्यास परवानगी दिली जात नाही. इराणच्या जहाजावर तुर्की, भारतीय १५ दिवसांनंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या परवानगीनंतरच हे जहाज बंदरात लॅण्डिंग करू शकेल, अशी माहिती जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. बंदरात मालवाहू जहाजे शेड्युलप्रमाणेच दाखल होत आहेत. त्यामुळे आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही कपूर यांनी सांगितले.

कोरोनामुळे बंदरात येणाºया मालवाहू जहाजांची संख्या कमी झाली आहे. पाच कंपन्यांच्या जहाजांनी शेड्युल ब्रेक केले असल्याची माहिती जेएनपीटीच्या संबंधित अधिकाºयांनी दिली. तर भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदरावर कोरोनाचा परिणाम झाला नसल्याचा दावा बंदराचे एचआर अवधूत सावंत यांनी दिली.

Web Title: Coronavirus : Iran's cargo stand at sea form ten days, red signal in JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.