Coronavirus, Lockdown News: कोरोनाचा विळखा: एपीएमसीतील आवक सलग तिसऱ्या दिवशीही घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:52 AM2020-05-05T00:52:44+5:302020-05-05T00:53:08+5:30
बाजार समितीत आतापर्यंत ३३ जणांना लागण; व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना
नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून तीन दिवसांपासून आवक सातत्याने घटली आहे. व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेकांनी घरी थांबणे पसंत केले आहे.
बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये आतापर्यंत ३३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मार्केटच्या गेटबाहेर किरकोळ विक्रेते व रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे २५ जणांना प्रादुर्भाव झाला असून एपीएमसी संबंधित रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. यामध्ये व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, कँटीनमधील कामगार व व्यापाºयांच्या कार्यालयात काम करणाºयांचाही समावेश आहे.
मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्ण वाढू लागल्यानंतर ही सर्व मार्केट बंद ठेवण्याऐवजी रुग्ण सापडलेली विंग सील केली जात आहे. रुग्णांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयास लागण झाल्यानंतर अनेक सुरक्षा कर्मचाºयांनी सुट्टी घेतली आहे. व्यापारी व कामगारांनीही सुट्टी घेण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी केवळ ११३ गाड्या आल्या आहेत. तर चार मार्केटमध्ये मिळून फक्त ५७० वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली असून ५० टक्के आवक घटली आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांत पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजीपाला व्यापाऱ्यांचे आवाहन
भाजीपाला मार्केटमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर व्यापाºयांनी सोशल मीडियावरून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या गाळ्यांत
रुग्ण सापडले आहेत तेथील व्यापार थांबविला आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनीही मार्केटमध्ये येणे
थांबवावे. स्वत: ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.