शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 1:22 AM

व्यावसायिकांचा संतप्त सवाल; दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबवून कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने तसेच लहान व्यवसाय बंद ठेवण्यात येत असल्याने नवी मुंबईतील लहान व्यवसाय करणारे व्यावसायिक संतप्त झाले असून, कसले ‘ब्रेक द चेन’ गळ्यातील चेन मोडायची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकाने बंद ठेवणे पर्याय नसून दिवसातून काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली जात आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नवी मुंबई शहरात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांना सुविधा देण्यासाठी बंद केलेली कोविड केअर सेंटर खुली केली जात आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून राज्यात शासनाच्या माध्यमातून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योग, व्यापार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार वर्गासह लहान व्यावसायिक भरडले गेले. हातावरचे पोट असणाऱ्यांना उपासमारीची झळ सोसावी लागली होती. नोव्हेंबर २०२० पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर जानेवारी महिन्यापासून उद्योगधंदे काही प्रमाणात व्यवस्थित सुरू झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असून, मार्च महिन्यात कोरोनारुग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यावर उपाय म्हणून ‘ब्रेक द चेन’द्वारे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध लहान व्यावसायिकांसह, व्यापारीदेखील संतापले असून, कसले ‘ब्रेक द चेन’ गळ्यातील चेन मोडायची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनाच्या सोबत आहोत; परंतु दुकाने बंद ठेवणे यासाठी पर्याय नसल्याचे सांगत दिवसातून काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्या लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर दोनच महिने व्यवसाय सुरू होते. आता पुन्हा कोरोना वाढल्याने व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गाला पडला आहे.सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोयगेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत. बँकांचे हफ्ते थकले आहेत, मुलांची शैक्षणिक फी भरलेली नाही, उदरर्निवाह करणे जिकिरीचे झाले असून कर्ज वाढले आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याच्या निर्णयामध्ये शासनाने शिथिलता देणे गरजेचे आहे.- भावना पटेलगेल्या वर्षभरात दोनच महिने दुकान सुरू होते; परंतु भाडे पूर्ण वर्षभराचे भरावे लागणार आहे. जानेवारी महिन्यापासून व्यवसाय सुरू झाल्याने सर्व हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अशा निर्माण झाली होती. परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा तोच प्रसंग आल्यावर आता काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- प्राजक्ता दिवेकरलॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजूनही होत आहे. उत्पन्न बंद परंतु खर्च आणि कर्ज वाढतच आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा वेळेचे बंधन घालून काही वेळ तरी व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. शासनाने पुन्हा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दागिने विकून घर चालवत आहोत.- पायल ठाकूरकोरोनाच्या लढाईत आम्ही शासनासोबत आहोत; परंतु आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवणे हा उपाय असू शकत नाही. त्यामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत. गेल्या वर्षभरात खूप समस्या आल्या. यापुढे उदरर्निवाह करणेदेखील कठीण आहे. शासनाने लहान व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतिपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.-  साधना गर्जे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या