CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:47 AM2021-12-18T11:47:55+5:302021-12-18T12:13:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान एका धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News 16 students of Ghansoli school found Covid-19 positive | CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

Next

देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णसंख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,145 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 289 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,77,158 लोकांना गमवावा आपला जीव लागला आहे. देशात आता ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच नवी मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. घणसोलीमधील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची देखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकांची  चिंता वाढली आहे. महानगरपालिका प्रशासनाने शाळेचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेतील आतापर्यंत 389 जणांची चाचणी करण्यात आली असून 600 जणांची चाचणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. महाराष्ट्रात 40, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, तेलंगणा 8, कर्नाटकमध्ये 8, गुजरात 7, केरळमध्ये 7 तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.

'... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा

भारतात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशसह 12 राज्यांमध्ये आतापर्यंत 113 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून लोकांना सतर्क राहण्याच आवाहन करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती देखील त्यांनी यावेळी सांगितली. डॉ. व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे. निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो असं म्हटलं आहे.

"जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या कोरोनाचा आवाका पाहिला आणि तसाच रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला, तर देशात दिवसाला तब्बल 14 लाख कोरोना रुग्ण सापडतील" असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. "ओमायक्रॉन घातक ठरत असल्याची अद्याप ठोस आकडेवारी हाती आलेली नसली तरी अजूनही हा प्रकार पूर्णपणे समजायचा आहे. त्यामुळेच अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे." "ओमायक्रॉनची सौम्य लक्षणं जाणवतात मात्र हा अत्यंत वेगाने पसरत आहे" असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे. आफ्रिका आणि युरोप प्रमाणे जर कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड मोडला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होईल.

 

Web Title: CoronaVirus Marathi News 16 students of Ghansoli school found Covid-19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.