CoronaVirus खळबळजनक! क्वारंटाईन वाढल्याने संतापला; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:38 PM2020-05-06T20:38:52+5:302020-05-06T20:40:28+5:30

चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन केल्यानंतर पुन्हा क्वारंटाईन चा कालावधी वाढल्याने त्रस्त झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पळ काढला होता.

CoronaVirus in Marathi News corona positive patient ran away; CBD police caught hrb | CoronaVirus खळबळजनक! क्वारंटाईन वाढल्याने संतापला; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

CoronaVirus खळबळजनक! क्वारंटाईन वाढल्याने संतापला; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

googlenewsNext

नवी मुंबई : क्वारंटाईन करण्यात आलेला कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण पळाल्याची घटना बुधवारी घडली. त्याची माहिती मिळताच सीबीडी पोलीस व वैद्यकीय पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. भररस्त्यात चाललेल्या या थरारनाट्यानंतर परिसर सॅनिटाईज करण्यात आला. 

चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन केल्यानंतर पुन्हा क्वारंटाईन चा कालावधी वाढल्याने त्रस्त झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पळ काढला होता. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याला पकडून  वैद्यकीय पथक घटनास्थळी आल्यानंतर त्याला सॅनिटाईज करून रुग्णवाहिकेतून पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तो पनवेलच्या इंडिया बुल्स मधून पळून आला होता असे समजते. ज्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे व शेवटच्या चाचणी निगेटिव्ह आल्या अशांना सोडत असताना संधी साधून तो पळाला होता. 

दरम्यान, त्याला पकडण्यासाठी सीबीडी पोलिसांना भर रस्त्यात थरारनाट्य करावे लागले. अखेर त्याला पकडून पालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर तिथला परिसर देखील सॅनिटाईज करण्यात आला. 

महत्वाच्या बातम्या...

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ

CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले

Web Title: CoronaVirus in Marathi News corona positive patient ran away; CBD police caught hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.