Coronavirus: कोरोना संदर्भात रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील डॉक्टरांसोबत बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:56 PM2020-03-16T20:56:07+5:302020-03-16T20:56:43+5:30

कोरोना या आजाराबद्दल सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये गैरसमज आहे.

Coronavirus: Meeting with city doctors to raise awareness among patients regarding corona | Coronavirus: कोरोना संदर्भात रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील डॉक्टरांसोबत बैठक 

Coronavirus: कोरोना संदर्भात रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील डॉक्टरांसोबत बैठक 

Next

पनवेल: कोरोनाच्या संसर्गाबद्दल रुग्णांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. कोरोनाच्या संदर्भात रुग्णामध्ये वाढत्या अफवांवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निवडक डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी बैठक घेतली. 

कोरोना या आजाराबद्दल सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्याचा फैलाव लागण याबाबत सर्वानीच सतर्क राहणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रात डॉक्टरांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात.त्यांच्यामध्ये देखील कोरोना संदर्भात भीती निर्माण झाली आहे.अशा रुग्णांना कोरोना बाबत जागृत करण्याच्या दृष्टीने यावेळी आयुक्त देशमुख यांनी उपस्थित डॉक्टरांना सूचना केल्या.

पुणे येथे नुकतीच कोरोना संदर्भात परिषद पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने महत्वाची चर्चा यावेळी पार पडली.डॉक्टरांकडे आलेल्या परदेशी नागरिकांची माहिती डॉक्टरांनी पालिकेला द्यावी,कोरोना संशयित आढळल्यास त्यासंदर्भात संशयितांला योग्य सल्ला देऊन संशयितांची माहिती पालिकेला यदेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ,डॉ जी गुणे, नगरसेवक डॉ अरुण भगत ,डॉ वैभव भदाणे आदींसह खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल , खारघर शहरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Coronavirus: Meeting with city doctors to raise awareness among patients regarding corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.