नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळू लागला आहे. मुख्य रोड व चौकांमध्ये पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, परंतु अंतर्गत रोड व बाजारपेठेमधील गर्दी कायम आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर व विनाकारण रोडवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. नियम धाब्यावर बसविणा-या मूठभर नागरिकांचा फटका सर्वच शहरवासीयांना बसू लागला आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ४ जुलैपासून संपूर्ण नवी मुंबईमध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे, परंतु महानगरपालिका व पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांकडून नियम पायदळी तुडविण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार व रविवार दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नव्हते. पावसामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली होती, परंतु सोमवारी पावसाने उघडीप देताच अनेक जण नियम धाब्यावर बसवून घराबाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. पोलिसांनी मुख्य रोड व चौकामध्ये बंदोबस्त ठेवला आहे, परंतु कोरोनाचा प्रसार होणाºया वसाहतीमध्ये व अंतर्गत रोड व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होतच आहे. शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येक नोड, चौक, रस्ते व पदपथावर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे.मद्यविक्री सुरूच असल्याने गर्दीमद्यविक्री दुकानांच्या बाहेरील गर्दीही वाढत आहे. दुकानांमध्ये मद्यविक्रीला बंदी आहे. आॅनलाइन आॅर्डर करून घरपोच डिलीव्हरी देणे अभिप्रेत आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. चहाची दुकाने बंद, पण दारूची सुरू अशी स्थिती शहरात आहे. सीवूड, नेरुळ, सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील दुकानामध्ये मद्यखरेदीसाठी गर्दी होत आहे.लॉकडाऊन नक्की कोणासाठी?शहरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक नोडमध्ये हजारो नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करत नाहीत.पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाशहरातील पेट्रोल पंपावरही वाहनांच्या रांगा दिसत आहेत. वास्तवित, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतरांना इंधन दिले नाही पाहिजे, परंतु नवी मुंबईमध्ये सरसकट सर्वांना इंधन दिले जात आहे. ओळखपत्रही पाहिले जात नाही.
coronavirus: नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, अंतर्गत बाजारपेठेतील गर्दी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 12:08 AM