नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शुक्रवारी केंद्रीय पथकाने भेट दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ११ ते १७ मेपर्यंत मार्केट बंद असून सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करून सोमवारपासून मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.नवी मुंबईत साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण एपीएमसीशी संबंधित आहेत. ११ मे पासून एक आठवडा येथील पाचही मार्केट बंद आहेत. या कालावधीत पालिकेच्या दहा पथकांमार्फत आरोग्य तपासणी सुरू आहे. पाचही बाजारपेठांचे विशेष निर्जंंतुकीकरण केले जात आहे.मार्केट सोमवारपासून सुरू करण्यासाठी कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोकण आयुक्त शिवाजी दौंड, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार व एपीएमसी अधिकाऱ्यांची शनिवारी दुपारी एपीएमसीमध्ये बैठक होणार असून यावेळी मार्केट सुरू करण्यासाठी सुधारित नियमावली निश्चित केली जाणार आहे.केंद्रीय पथकाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजार आवारात भेट दिली व कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. कांदा बटाटा बाजार आवारात माथाडी कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असलेल्या जागेवरही पथकाने भेट दिली.- अनुप कुमार, प्रधान सचिव,कृषी पणन विभागआरोग्य तपासणीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ मेपासून आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी चार मार्केटमध्ये १७२३ जणांची तपासणी केली आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये ४०३, धान्य मार्केटमध्ये १०२५, मसाला मार्केटमध्ये २९५ जणांची तपासणी केली. पाच संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.महानगरपालिकेने केल्या सूचनाएपीएमसी मार्केटचे कामकाज १८ मे पासून पुन्हा सुरु करताना जास्तीत जास्त व्यवहार आॅनलाईन व्हावेत. शेतमाल निर्मितीच्या ठिकाणाहून उचलून थेट विक्रेत्यापर्यंत पोहचेल व मार्केट आवारात वाहनांची वा माणसांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी प्रशासनाला केल्या. मार्केट आवारात प्रवेश करणाºया प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे. सर्दी, ताप, घशात खवखव अथवा श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे आढळणाºया व्यापारी, कर्मचारी, कामगारांना प्रवेश देण्यात येऊ नये तसेच अशा व्यक्तींची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक पालिकेस कळविण्यात यावेत, सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
coronavirus: मुंबई एपीएमसी सोमवारपासून पुन्हा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:10 AM