शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

coronavirus: अफवा पसरविणाऱ्यांवर पालिका आयुक्तांचा ‘वॉच’, कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:01 AM

नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा जास्त झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, या काळात काही जण मुद्दाम अफवा पसरविण्याचे काम करत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे. काही ठेकेदार व कामगार महापालिका व शहरास वेठीस धरण्याचे काम करत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. तीन खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात आली आहे. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. याशिवाय १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून आणखी काही खरेदी केल्या जात आहेत.शहरातून काही गैरसोयींविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी वेळेत औषध फवारणी होत नाही. इंडिया बुलमधील क्वारंटाइन केंद्रात सुविधा मिळत नाहीत. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही. अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची तत्काळ शहानिशा केली जात आहे. आयुक्तांनी इंडिया बुल इमारतीमध्ये स्वत: पाहणी केली असून काही त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत.नवी मुंबईमध्ये काही घटक जाणिवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत. अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व दुकाने खुली करण्याचा महापालिकेचा निर्णय झाल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या आहेत. महापालिकेने तत्काळ या वृत्तांचे खंडन केले असून, अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका व इतर अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत; परंतु काही कर्मचारी व ठेकेदार पालिकेला व पर्यायाने शहरास वेठीस धरत आहेत. कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत. अशा कामचुकार ठेकेदार व कामगारांना नोटीस देणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.संशयास्पद मृत्यूचा अहवाल २४ तासांत मिळणारनवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एक हजारपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवस विलंब होत आहे. संशयास्पद मृत्यू होणाºयांचा अहवालही उशिरा मिळतो.या दिरंगाईमुळे कोरोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे यापुढे संशयास्पद मृत्यू होणाºयांची महापालिका स्वखर्चाने खासगी लॅबमधून तपासणी करून घेणार आहे. २४ तासांत अहवाल मिळवून पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून नवीन रुग्णवाहिका खरेदीकेल्या जात आहेत. प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे. काही जण अफवा पसरवत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांवरही कारवाई केली जाणार आहे.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई