Coronavirus : पालिका रुग्णालयात प्रशासनाचा निष्काळजीपणा, कक्षाची निर्मिती, परंतु तपासणीच्या सुविधा नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:35 AM2020-03-18T02:35:11+5:302020-03-18T02:35:42+5:30
रुग्णालयांमध्ये तपासणी केल्याविना रुग्ण आणि नागरिक ये-जा करीत आहेत. यामुळे पालिका रुग्णालयातील रु ग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : कोरोना व्हायरससाठी शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई शहरातील खासगी आणि महापालिका रु ग्णालये सज्ज झाली आहेत. खाजगी रुग्णालयात ये-जा करणाºया नागरिकांना सॅनिटायझर देण्यात येत आहे परंतु महानगरपालिका रु ग्णालयांमध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. रु ग्णालयांमध्ये तपासणी केल्याविना रु ग्ण आणि नागरिक ये-जा करीत आहेत. यामुळे पालिका रु ग्णालयातील रु ग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पालिका रु ग्णालयात ३८ खाटांच्या आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याने कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या स्वइच्छेने तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात पाठविले जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित नागरिकांची तपासणी व्हावी तसेच त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यानुसार शहरात महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आणि खासगी रु ग्णालयात विविध कक्षांची स्थापनादेखील करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील खासगी रु ग्णालयात ये-जा करणारे सर्व प्रकारचे रु ग्ण, नातेवाइक आणि नागरिकांना प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी हातावर सॅनिटायझर देण्यात येत असून इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र महापालिका रु ग्णालयात रु ग्ण, नातेवाईक आणि नागरिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून तपासणीविनाच नागरिकांचीदेखील ये-जा सुरू आहे. महापालिका रु ग्णालयाशेजारी असलेल्या फोर्टीस रु ग्णालयात येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद करून घेण्यात येत असून हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येत आहे. तसेच इतर तपासण्या करूनच रु ग्णालयात प्रवेश देण्यात येत आहे. महापालिका रु ग्णालयात अशा प्रकारच्या सुविधा देण्यात महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा मुक्त वावर सुरू असून यामुळे धोका बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वाशी येथील रु ग्णालयात ३८ खाटांच्या आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना आजाराशी संलग्न असलेली काही लक्षणे आढळल्यास नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असून शंका दूर करण्यासाठी महापालिका रु ग्णालयात तपासणीसाठी नागरिक येत आहेत, परंतु तपासणीच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून पालिका रु ग्णालयात येणाºया नागरिकांना मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात जाण्याचा सल्ला पालिका रूग्णालय प्रशासन देण्यात येत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर
महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाºया आरोग्य कर्मचाºयांना विभागात नव्याने येणाºया नागरिकांच्या तसेच सहलीवरून, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या नोंदी करण्यात येत आहेत तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल पाठविण्याचे काम देण्यात आले आहे.
नागरी आरोग्य केंद्रात मास्कचा तुटवडा असल्याने दिवसभर शेकडो नागरिकांच्या संपर्कात येणाºया आरोग्य कर्मचाºयांना मास्क देण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कर्मचाºयांची सुरक्षा धोक्यात
महापालिका रु ग्णालयात काम करणाºया सफाई कर्मचाºयांना रु ग्णालयाची स्वच्छता राखावी लागते. या कर्मचाºयांकडे मास्क तसेच हातमौजे उपलब्ध नसल्याने त्यांची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. कर्मचाºयांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे.