शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

coronavirus : कोरोनाग्रस्त महिलेने दिला मुलीला जन्म; महापालिकेचे डॉक्टर बनले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 11:33 PM

या कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला असून सोमवारी ६ रोजी दुपारी प्रसूत झाली. दोन दिवसापूर्वी या गरोदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.

- अनंत पाटील

नवी मुंबई – कोरोनाचा संसर्ग झालेल्या घणसोली येथील गरोदर ३४ वर्षीय महिलेची सध्या लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत बाळाला जन्म दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सिझेरियन प्रसूती करण्यात येथील प्रसिद्ध डॉ.राजेश म्हात्रे यांच्या टीमला यश आले आहे. या कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला असून सोमवारी ६ रोजी दुपारी प्रसूत झाली. दोन दिवसापूर्वी या गरोदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.घणसोली घरोंदा येथे राहत असलेल्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेला रविवारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ती राहत असलेली संपूर्ण इमारत सील करण्यात आली होती. ती गरोदर असल्यामुळे तिला अधिक वेदना जाणवू लागल्याने रविवारी सकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र तिथे खाटांची उपलब्धता नसल्यामुळे रविवारी ५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले.पहिल्या बाळंतपणात तिची सिझेरियन प्रसूती झाली होती. आता पण तिची सिझेरियन प्रसूती करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे स्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर टीमने सिझेरियन करून यशस्वी प्रसूती केली. महाराष्ट्रातील बहुधा अशी  पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. सध्या बाळ बाळंतीण सुखरूप असून कोरोनाग्रस्त महिलेला महापालिकेच्या कोरोना आयसोलेशन विभागात तर बाळाला तिचा संसर्ग होऊ नये म्हणून एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या