नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या 9 झाली आहे. एकाच घरातील चौघांना लागण झाली असून यामध्ये दीड वर्षाच्या मुलाचादेखील समावेश आहे.
नवी मुंबई मधील कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सर्वप्रथम फिलीपाईन्सवरून वाशीमध्ये आलेल्या एक व्यक्तीस कोरोना झाला. त्याच्या सानिध्यातील इतर दोन फिलीपाईन्स नागरिकांनाही बाधा झाली. यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीलाही कोरोना झाला. या व्यक्तीसह घरातील एकूण चौघांना कोरोना झाला असून त्यामध्ये मुलगा, नोकर व दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त ऐरोलीमधील एकाला कोरोना झाला आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेनेही सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.