coronavirus: नवी मुंबईत एकाच दिवशी ६५ रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:17 AM2020-05-10T06:17:11+5:302020-05-10T06:17:28+5:30
एपीएमसी मधील प्रादुर्भाव ही वाढतच चालला आहे. मार्केटमधील सात जणांना कोरोना झाला असून रुग्णांच्या संपर्कातील १६ जणांना लागण झाली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी दिवसभरात ६५ रुग्ण वाढले असून एकूण संख्या ५९२ झाली आहे. सानपाडा व वाशीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या १२ झाली आहे.
एपीएमसी मधील प्रादुर्भाव ही वाढतच चालला आहे. मार्केटमधील सात जणांना कोरोना झाला असून रुग्णांच्या संपर्कातील १६ जणांना लागण झाली आहे. शनिवारी तुर्भे मध्ये २१, नेरूळमध्ये १५, कोपरखैरणेत ८, घणसोलीत व ऐरोलीत ५, दिघासह बेलापूरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत.
नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे येथे सर्वाधिक ११४ रुग्ण झाले असून, तुर्भेतील एकूण रूग्णांची संख्या १०५ वर पोहचली आहे. अद्याप १६१७ रूग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
एपीएमसीत व्यापाऱ्याचा मृत्यू
एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमधील व्यापाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एपीएमसीमधील हा पहिला बळी असून एकूण ९८ जणांना लागण झाली आहे. रुग्णांच्या संपर्कामुळे ६८ जणांना प्रादुर्भाव झाला असून एपीएमसीशी संबंधित रूग्णांची संख्या १६६ झाली आहे.