शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Coronavirus Navi Mumbai updates: गर्दीमुळे नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोरोनाचा स्फोट; बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:23 AM

रेल्वेसह बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर : कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे. बाजार समितीच्या सचिवांसह प्रमुख व्यापारी व संचालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रेल्वे, भाजी मंडई, कामगार नाके व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे शहरात कोरोनाचा स्फोट झाला असून अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसांमध्ये रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात धुवा व मास्कचा वापर करा, असे आवाहन नवी मुुंबई व पनवेल महानगरपालिका प्रशासन करत आहे. परंतु या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. मुंबई बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन जवळपास १ लाख नागरिकांची ये - जा सुरु आहे. भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. बाजार समितीमुळे शहरात इतर भागांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पनवेल बाजार समितीमध्येही सकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नियमांचे पालन होेत नाही. यामुळे दोन्ही बाजार समित्या कोरोना प्रसाराचे केंद्र झाल्या आहेत. 

तर, रेल्वेतील गर्दीमुळेही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरू केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. नवी मुंबई व पनवेलमधील कामगार नाक्यांवरही गर्दी वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये १ मार्चपासून तब्बल १२ हजार जणांना कोरोना झाला आहे. नवी मुंबईमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० जणांना व पनवेलमध्ये सरासर ३५० जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनावाढीचा हा वेग असाच राहिला तर पुढील एक महिन्यात रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बंद केलेली दोन उपचार केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. अशीच स्थिती राहिली तर सर्वांना उपचार मिळवून देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर भांडणमुंबई बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये नियम तोडणारांवर सुरक्षारक्षक कारवाई करत आहेत. परंतु नियम तोडणारे काही जण सुरक्षारक्षकांना मारहाण व शिवीगाळ करत आहेत. सुरक्षारक्षकांनाच संरक्षण देण्याची वेळ आली आहे. कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी वाद घालणारांवर पोलिसांनीही कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा बाजार समितीमध्ये शिस्त लावणे अवघड होणार आहे.

संचालकांसह सचिवांनाही कोरोनामुंबई बाजार समितीच्या एका संचालकांना व अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाजार समिती सचिवांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे आता तरी बाजार समितीमध्ये कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस