शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Coronavirus : थुंकणाऱ्यांवर कारवाईची गरज, पान टप-या सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 4:18 AM

पानटपऱ्यांवरील मसालाजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर सर्रास थुंकण्याचा प्रकार अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबाबत कडक कारवाईची गरज आहे.

- वैभव गायकरपनवेल : कोरोनाच्या संसर्गापासून शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, मॉल्स, पानटपºया, शोरूम्स आदींसह लहान-मोठी दुकाने बंद करण्याचे आदेश बुधवारी पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांनी लागू केले आहेत. मात्र तरीही काही बेजबाबदार नागरिक आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पानटपऱ्यांवरील मसालाजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर सर्रास थुंकण्याचा प्रकार अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबाबत कडक कारवाईची गरज आहे.पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजन राबविल्या जात आहेत. काही दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. तर काही अज्ञानी नागरिकांकडून तंबाखूजन्य पदार्थांच्या पिचकाºया सर्रास रस्त्यांवर उडवल्या जात आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे इतरांच्या आरोग्यास धोकादायक आहे. हा गुन्हा असून दंडात्मक कारवाईचीही तरतूद आहे. प्रशासन कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असताना अनेक जण रस्त्यावर, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक तसेच शहरातील चौक आदी ठिकाणी पिचकाºया उडवताना दिसत आहेत. यामध्ये पादचाºयांपासून दुचाकी, चारचाकी चालकांचा समावेश आहे. प्रत्येकाने याबाबत गंभीर राहण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पानटपºयांतून सर्वात जास्त तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. या टप-या बंद करण्याचे आदेश पारित केले असताना अशा प्रकारे सर्रास दुकाने उघडी ठेवणाºयांवर कारवाईची आवश्यकता आहे.सध्याच्या घडीला प्रत्येक लहानातली लहान खबरदारी प्रत्येकाने घेणे, हे आपले कर्तव्य आहे. उघड्यावर थुंकल्यास संसर्गाची शक्यता अधिक असते. नागरिकांनी उघड्यावर थुंकणे टाळणे गरजेचे आहे.- डॉ. वैभव मोकल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई